शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

गारपीट, अवकाळी पावसाने मराठवाड्यातील ३३२ गावांत रबी हंगामाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 1:23 PM

जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून ४३ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देविभागातील १५ तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले

औरंगाबाद : मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५ तालुक्यांतील ३३२ गावांतील रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार विभागातील जालना, परभणी आणि औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. विभागात ८ हजार ५०० गावे आहेत. त्यातील २९४ गावांना गारपिटीने झोडपले. सर्व जिल्ह्यांत मिळून सरासरीच्या तुलनेत ३० मि.मी.च्या आसपास अवकाळी पाऊस झाला. यात ३ व्यक्तींचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले. २७ लहान आणि २१ मोठे जनावरे दगावली.

जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून ४३ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ५ तालुक्यांत १३४ गावांत नुकसान झाले. ३८ हजार २४५ हेक्टरवरील पिके गारपिटीने आडवी केली. जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावांतील ५६८ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील १ तालुक्यांतील ३८ गावांतील २१५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर, नांदेडमध्ये, हिंगोलीत काही नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३३४९ हेक्टरवरील तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १२२१ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

१६ हजार क्षेत्रफळ अतिबाधित३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान १६ हजार हेक्टरवर झाले आहे. यात सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १४४५८ हेक्टर, जालन्यातील ५६८ हेक्टर तर ११०३ हेक्टरवरील पिके बीड जिल्ह्यातील वाया गेली आहेत. उस्मानाबादमधील १३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसHailstormगारपीटagricultureशेती