रबी पिकाला लहरी निसर्गाचा फटका
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:54+5:302020-12-03T04:10:54+5:30
खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी ...

रबी पिकाला लहरी निसर्गाचा फटका
खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या ही पिके चांगली उगवली असून डोलत आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून निसर्ग सतत रंग बदलत असल्यामुळे रबी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन रोगराईला निमंत्रण मिळत आहे. रबी पिकांना थंडीची आवश्यकता असते. मात्र, सतत ढगाळ वातावणामुळे थंडी गायब झाली असून याचा परिणाम पीक वाढीवर होत आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर चिकटा पडत असून मका पिकावर लष्करी अळी, गहू पिकावर मावा तर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच अतिवृष्टीने उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आता बदलत्या वातावरणामुळे रबी पिकेही धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
फोटो कॕॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात लहरी निसर्गामुळे ज्वारी पीक असे आडवी झाली आहे.
२) लाडसावंगी परिसरात ढगाळ वातावरणासह दररोज धुके येत आहे.