'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:29 PM2024-01-01T18:29:38+5:302024-01-01T18:31:15+5:30

मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याने काही कामगारांनी कंपनीच्या छतावरून चढावर चढत खाली उड्या मारून आपला जीव वाचविला

Rab Ki Mehrabani Hum Bach Gaye; Magar apno ko khone ka malal; The eyes of the workers who survived the fire shed tears | 'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले

'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले

वाळूज महानगर : उद्योगनगरीतील सनशाईन या कंपनीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कामगारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेत जवळचे नातलग व सहकारी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या आठवणीने कामगारांचे डोळे पाणावले होते.

या कंपनीत काम करण्यासाठी ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन मुस्ताक यांनी गावाकडील कामगारांना कामासाठी आणले होते. या कंपनीत काम करणाऱ्या कामगार व ठेकेदाराची कंपनीमालक साबेरखान पठाण याने कंपनीतील सहा रूममध्ये व्यवस्था केली होती. या कामगारांना ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन याची पत्नी इस्मजहॉ शेख ही स्वंयपाक करून जेऊ घालत असे. शनिवारी कंपनीतील कामकाज संपल्यानंतर रात्री जेवण करून कामगार आपआपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले होते. मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याने काही कामगारांनी कंपनीच्या छतावरून चढावर चढत खाली उड्या मारून आपला जीव वाचविला, तर ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन याने पत्नी इस्मतजॅहा, मुलगा मो. मुज्जमील व मुलगी आयशा यांना कसेबसे कंपनीतून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले. मात्र, पत्नी व मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात वृद्ध वडील मो. मुस्ताक हे कंपनीत अडकल्याने त्यांचा या घटनेत मृत्यू झाला. या कंपनीत काम करणारा मो. दिनारूल हा वाचला असून, त्याचा भाऊ मो. एक्बाल हा मात्र त्यास सोडून गेला.

बच गये, मगर अपनो को खोने का मलाल...
या आगीच्या घटनेत ठेकेदार मो.हसीनोमुद्दीन, पत्नी इस्मत जहा व दोन्ही मुले नशीब बलवत्तर असल्याने बचावली आहेत. पती मो.हसीनोमुद्दीन यांनी जिवाची तमा न बाळगता मला व दोन्ही मुलांना आगीतून बाहेर काढले. मात्र वडील मो.मुस्ताक यांना वाचविता न आल्याने दोघे पती-पत्नी शोकसागरात बुडाले होते. या दुखदप्रसंगी इस्मतजहॉ यांनी रब की मेहरबानी हम बच गये, मगर अपनो को खोने मलाल जिंदगीभर रहेंगा असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

अपने भाई को न बचाने का गम
या घटनेत मो. दिनारुल हा सुदैवाने वाचला असून त्याचा भाऊ मो.एक्बाल हा कमनशिबी ठरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सभी कह रहे थे, भाई सिर्फ घायल हुआ है, मगर बाद मे पता चला भाईकी मौत हो चुकी, इससे गहरा सदमा लगा है. अपने भाई को न बचाने का गम हमेशा रहेगा, असे मो.दिनारुल याने रडतच सांगितले.

Web Title: Rab Ki Mehrabani Hum Bach Gaye; Magar apno ko khone ka malal; The eyes of the workers who survived the fire shed tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.