शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पुष्कर श्रोत्रीच्या ‘पूर्वी लुम्बिबा’ने नाट्यगृह घेतले डोक्यावर...

By admin | Updated: December 22, 2014 23:44 IST

जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ या नाटकास सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत,

जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ या नाटकास सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, पुष्कर श्रोत्री यांच्या एकाहून एक सरस अदाकारीने सखीमंच सदस्यांवर चांगलेच गारुड केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली. यावेळी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात, चेअरमन मुकेश ओसवाल, व्हाईस चेअरमन दादाराव अटकळ, संचालक डॉ. डी.आर.चव्हाण, एन.बी.पगारे, महाव्यवस्थापक प्रदीप गर्जे पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात यांनी उपस्थित सखीमंच सदस्यांना बँकेच्या वतीने सुरु असलेल्या विविध योजनाबद्दल मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रियदर्शनी बँकेस सखीमंच सदस्यांनी आवर्जुन भेट द्यावी, महिलांसाठी सुरु असलेल्या योजनांची माहिती घ्यावी. बँकेत खाते उघडून एटीएमसह अन्य सुविधांचा लाभ घ्यावा. प्रियदर्शनी बँकही महिलांचीच बँक असून, या बँकेत ७० टक्के महिला उत्कृष्टपणे काम करीत आहेत. महिलांच्या कर्तबगारीमुळेच बँकेस यावर्षीचा महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनच्या वतीने बँक २०१४ सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले. पुष्कर श्रोत्री यांनी विविध बहुरंगी सहा भूमिका साकारुन सखीमंच सदस्यांना अक्षरश: अडीच तास हस्यकल्लोळात बुडविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)४पुष्कर श्रोत्री यांनी सुरुवातीस चिमनरावांची भूमिका साकारत अस्सल पुणेकरांची आठवण करुन दिली. चायनीज भूमिकेत चिंगपाँग हा चायनीज नवऱ्याची अफलातून भूमिका साकारुन महिलांच्या टाळ्या मिळविल्या. कोंबड्याचा व्यापारी, जिब्राणिया येथे स्थाईक झालेली पूर्वी पटेल लुम्बिबा ही महिलेच्या वेषातील अफलातून भूमिका सादर होताच सखीमंच सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले.४त्यानंतर वेस्टर्न पद्धतीचा बॉबही उत्कृष्ट सादर केला. हेरंबकर यांची भूमिका सादर करुन महिलांना वास्तव परिस्थितीचे भान करुन दिल्याने सभागृह काहीवेळ भावूक झाले होते. पुष्कर श्रोत्री यांच्या सोबत सतीश जोशी या कलाकाराने साकारलेली वाघमारेंची भाव खाऊन गेली. वैखरी पाठक यांनी उत्कृष्ट साद दिली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेने स्वीकारले होते.दीपप्रज्वलन ... लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक यांच्या सहकाऱ्याने आयोजित हसवा फसवी या विनोदी नाटकाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात, चेअरमन मुकेश ओसवाल, महाव्यवस्थापक प्रदीप गर्जे पाटील. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी साकारलेली महिला वेशातील भूमिका लक्षवेधी ठरली.