शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांची टोळी बनली ‘वासरांचा’ कर्दनकाळ !

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

शिरूर अनंतपाळ : मोकाट कुत्र्यांच्या टोळीने शिरूर अनंतपाळच्या शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडविली

शिरूर अनंतपाळ : मोकाट कुत्र्यांच्या टोळीने शिरूर अनंतपाळच्या शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडविली असून, महिनाभरात डझनभर वासरांचा फडशा तर अनेक गायी-म्हशींच्या कोवळ्या वासरांचे लचके तोडून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे समस्त शेतकरी त्रस्त झाल्याने कुत्र्यांची टोळी बनली वासरांचा ‘कर्दनकाळ’, अशी आर्त हाक देत आहेत. परंतु, शेतकऱ्यांची ही आर्त हाक ऐकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शिरूर अनंतपाळ येथे शेतीस पूरक म्हणून अनेक शेतकरी दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे अनेकांच्या शेतात गोठे असून, गोठ्यात गायी-म्हशींच्या कोवळ्या वासरांची संख्या सुद्धा भरपूर आहे. परंतु, या कोवळ्या वासरांना मोकाट कुत्र्यांच्या टोळीने सळो की पळो करून सोडले असून, दहा ते पंधरा कुत्रे अचानक येऊन गोठ्यात किंवा गोठ्या शेजारी बांधलेल्या वासरांवर अचानक हल्ला करून क्षणार्धात वासरांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली असून, दुग्धोत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर जखमी वासरांवर औषधोपचाराचा मोठा खर्चही करावा लागत आहे. महिनाभरात या मोकाट कुत्र्यांच्या टोळीने डझनभरापेक्षा अधिक वासरांचा फडशा पाडला आहे. परिणामी, मोकाट कुत्र्यांची टोळी ‘वासरांचा’ कर्दनकाळ बनली आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळीची समस्या दूर व्हावी आणि दुग्धोत्पादनास अडथळा होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, मनपा गटनेते मकरंद सावे यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले. (वार्ताहर)सोडलेली टोळी...दरम्यान, शिरूर अनंतपाळ शिवारात लातूर येथून कुत्र्यांची टोळी वाहनाद्वारे आणून सोडण्यात आली असल्याचेही शेतकरी लाला मुजेवार यांनी सांगितले.या शेतकऱ्यांना झळ...मोकाट कुत्र्यांच्या टोळीची झळ एक-दोन नव्हे, तर डझनभर शेतकऱ्यांना बसली असून, यामध्ये लाला मुजेवार, विश्वनाथ उंबरगे, शरद देवंगरे, लिंगेश्वर तोंडारे, वीरभद्र मनगुरे, त्र्यंबक सांगवे, शिवहार डोंगरे, बाळू घाडगे, विलास गजिले, बाबूराव संभाळे, तानाजी फुलारी, बालाजी पारशेट्टे आदी शेतकऱ्यांच्या पशुंना फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.