शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळांचा भक्तांसाठी २ कोटींचा भंडारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 20:02 IST

गणेशोत्सव : ९ लाख पत्रावळी; डाळबट्टीसाठी ४५ टन गव्हासह बासमती व सोनास्टीम तांदळाची खरेदी

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. एकीकडे नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी बुधवारी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळांकडून जागोजागी द्रोणांद्वारे प्रसादाचे वाटप केले जात होते. पुढील २ दिवसांत प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने सत्यनारायणाची पूजा व भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटींची उलाढाल या भंडाऱ्याच्या सामानात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

यंदा शहरात लहान-मोठ्या सुमारे ९०० गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. त्यातील ५०० गणेश मंडळांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाणार आहे. लगेच भंडाऱ्याच्या पंगती बसतील. २५ ते ३० मोठे सार्वजनिक गणेश मंडळ असे आहेत की, ते दररोज सायंकाळच्या आरतीनंतर द्रोणांमध्ये कधी तांदळाची कधी साबुदाणाची खिचडी असे ८ दिवस वेगवेगळे प्रसाद वाटप करीत आहेत. यासाठी ९ लाख पत्रावळी, १२ लाख द्रोण, १० लाख पाण्याच्या ग्लासची आतापर्यंत विक्री झाली आहे.

राजाबाजारात ६ लाखांचा भंडारासंस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने गणेशोत्सवात ९ दिवस अन्नदान करण्यात येते. यासाठी सुमारे ६ लाखांपर्यंत खर्च येते आहे. ९ दिवसांच्या अन्नदानाची ६ दशकांच्या परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही गणेश मंडळांनी अन्नदानास सुरुवात केली आहे.

पुलावसाठी बासमती, मसाला भातसाठी सोनास्टिमगणेशोत्सवात भंडाऱ्यामध्ये पुलाव किंवा मसालाभात आर्वजून केले जातात. यात पुलाव मोकळा होण्यासाठी लांब दाण्याचा बासमती तांदळाचा वापर करतात. तर मसालाभातासाठी सोनास्टिम हा तांदूळ वापरला जातो. गणेशोत्सवात ४५ ते ५० टन तांदळाची विक्री होते. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी शिऱ्याचा प्रसाद दिला जातो. यासाठी १० टन रव्याची विक्री झाली.

डाळबट्टी व गुलाबजामूनचा बेतआजही अनेक ठिकाणी भंडाऱ्यात बुंदी दिली जाते. मात्र, मागील ४ ते ५ वर्षांपासून गुलाबजामूनला मागणी वाढत आहे. बुंदी-बेसन १० टन, साखर १० टन, सोयाबीन तेल किंवा सरकी तेल २५ टन, डाळबट्टीसाठी मका ६ टन, गहू ४५ टन, गुलाबजामून पावडर ६० टन विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

दररोज ७० ते ८० हजार खर्चअष्टांगहृदय गणेश मंडळाने मुकुंद गोलटगावकर यांच्या सहकार्याने म्हैसूर विष्णू मंदिराचा देखावा साकारला आहे. आम्ही दररोज सायंकाळाच्या आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करतो. त्यासाठी दररोज ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.- मनोज वडगावकर, संस्थापक अध्यक्ष, अष्टांगहृदय गणेश मंडळ

सत्यनारायण पूजेसाठी दोन दिवसगणेशमूर्तींचे विसर्जन शनिवारी ६ तारखेला होणार आहे. त्याआधी म्हणजे गुरुवारी (दि.४ ) व शुक्रवारी (दि.५) या दोन तारखेपैकी एक दिवस सत्यनारायणाची पूजा करता येईल. यसाठी ५ केळीचे खांब, विड्याचे पान, खारीक, खोबरे, लाल सुपारी, हळदकुंड, खडीसाखर, तुळशीची पाने, विड्याची पाने, पूजा मांडण्यासाठी लागतात. तसेच काही ठिकाणी श्री सत्यविनायकाचीही पूजा केली जाते.- सुरेश केदारे गुरुजी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025