शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पीआरपीने काँग्रेसकडे दिली २४ जागांची यादी

By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य केले. विधानसभेलाही काँग्रेससोबत मैत्री असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर चालला. परंतु, या निवडणुकीत हा प्रभाव राहणार नाही, असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी पीआरपीने २४ जागांची यादी काँग्रेसवरिष्ठांकडे पाठविली आहे. राज्यात पीआरपीची काँग्रेस आघाडीसोबत युती आहे. काँग्रेस बरोबरच पीआरपीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे. त्यामुळे त्यांनीही जागा सोडाव्यात, असा आग्रह आम्ही धरल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची अजूनही पुर्तता झालेली नाही. महागाई वाढली आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून पूर्वीचेच सरकार बरे होते, अशी भावना जनतेची बनत चालली असल्याचे कवाडे म्हणाले. सध्या मोदी यांचाच रिमोट कंट्रोल असून देशाची लोकशाही हुकूमशाही होण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचाही निषेध करत त्यांचे वक्तव्य देशहिताचे नाही. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ते शोभणारे नाही, असे ते म्हणाले. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु, भारत हा शब्द राष्ट्रवाचक असून हिंदू हा शब्द धर्मवाचक आहे. त्यामुळे या विधानातून देशाला विघटनाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न होत असून असे वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महामंत्री चरणदास मोरे, महाराष्ट्र सचिव गौतम मुंडे, जिल्हाध्यक्ष डी.एस.लहाने, अरुण लोखंडे, कैलास हिरवाळे, संगिताताई मुळे, विलास बनसोडे, बापुसाहेब गजभारे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)