शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:10 IST

पोलिस पॉक्सो कलमाची वाढ करणार; महिलेवर हल्ल्यानंतर विकृताने रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले, पोलिसांनी राख जप्त केली

छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा प्रयत्न करून ३६ वर्षीय विवाहितेच्या संपूर्ण शरीरावर धारदार चाकूने वार करणाऱ्याची नवी विकृती समोर आली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (१९, रा. घारदोन) याने त्याच्या मोबाइलमध्ये घटनेच्या पंधरा दिवस आधी गावातील बालकाचे नग्नावस्थेतले फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण त्याच्या घरापर्यंत पोहोचलेही होते. तरीही, त्याने पंधराच दिवसाच्या आत थेट महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले.

२ मार्च रोजी घारदोन परिसरातील घटनेने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अभिषेकने शेतात काम करणाऱ्या एका विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याने धारदार चाकूने तिच्या संपूर्ण शरीरावर चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात चाकूने सपासप वार करून पाेबारा केला. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सद्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित, अंमलदार विक्रम जाधव, सचिन रत्नपारखे व इखारे यांनी चोवीस तासांत त्याला अटक केली.

बाहेरून भोळा, आतून विकृतबारावी नापास अभिषेक शेतीचे काम करतो. गावात कायम देवभक्त, भोळेपणाचा आव आणणाऱ्या अभिषेकचा खरा चेहरा समोर आल्याने त्याच्या गावकऱ्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी शिवेसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे अभिषेकवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. अशा घटना समाजासाठी लज्जास्पद आहेत. अशा क्रूरकर्म्याला भरचौकात फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पॉक्सो कलम वाढवणारपंधरा दिवसांपूर्वी त्याने गावातील एका घरासमोर खेळणाऱ्या बालकाचे मोबाइलमध्ये फोटो काढले होते. बालकाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त कुटुंबाने त्याला चांगलेच सुनावले होते. त्याच्या कुटुंबालादेखील ही बाब कळाली होती. मात्र, तरीही त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. तपास पथकाने त्याचा मोबाइल जप्त करून सायबर पोलिस व फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पंचासमक्ष तपासण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचे (पॉक्सो) कलम वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रक्ताचे कपडे जाळलेमहिलेवर अमानवीरीत्या हल्यात अभिषेकच्या कपड्यांना रक्त लागले हाेते. घराच्याच मागे त्याने ते कपडे पाळा पाचोळा टाकून जाळून टाकले. चिकलठाणा पोलिसांनी कपड्यांची राख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गुरुवारी जप्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPOCSO Actपॉक्सो कायदाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर