शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीला ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:58 IST

एकीकडे पालकमंत्री मॅरेथॉन बैठका घेऊन जालना नगरपालिकेला उत्पन्न वाढविण्याच्या सूचना देत आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला ब्रेक लागला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे पालकमंत्री मॅरेथॉन बैठका घेऊन जालना नगरपालिकेला उत्पन्न वाढविण्याच्या सूचना देत आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला ब्रेक लागला आहे. वर्षभरापासून मालमत्ताधारकांना कर वसुलीसाठीचे मागणी बिल पाठविणेच पालिकेकडून बंद आहे. पाणीपट्टी वसुली केवळ दोन टक्के आहे. मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा २१ कोटींवर गेला असताना आॅक्टोबरअखेर केवळ सव्वा कोटी रुपयांची वसुली झाली आहे.नगरपालिकेच्या उत्त्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी या वर्षी कुठलेही विशेष प्रयत्न होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. कर वसुलीसाठी नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे विवरण असलेले मागणी बिल दिले जाते.या मागणी बिलाच्या आधारेच वसुली लिपिक मालमत्ताधारकांकडून कर वसुली करतात. मात्र, यंदा डिसेंबरजवळ आला तरीही मालमत्ताधारकांना मागणी बिलांचे वाटप झालेले नाही. मागणी बिलाची छपाईच झालेली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वसुली लिपिक रजिस्टरवरील जुन्या हस्तलिखित नोंदींवरूनच वसुलीसाठी जात आहेत.शहरात सुमारे ५२ हजारांवर मालमत्ता असताना कर विभागाकडे केवळ १३ हजार ८०० मालमत्ताधारक पाणीपट्टी भरत असल्याचे नोंद आहे. पाणीपट्टीची एकूण थकबाकी नऊ कोटींवर असताना वसुलीचा आकडा २६ लाखांवरच अडकला आहे. मालमत्ता कर, शिक्षण, रोहयो, वृक्षकर, अग्निशमन कर वसुलीबाबत अशीच स्थिती आहे.मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा साडेसहा कोटी रुपये असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ३९ लाख ३९ हजारांची वसुली झालेली आहे. वसुली घटल्याचा थेट परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.मूलभूत सुविधांशी निगडित कामे, पाणीपुरवठा योजनेचे बिल भरण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागत आहे. कर वसुलीची एकंदर स्थिती पाहता चालू आर्थिक वर्षानुसार (२०१७-१८) मार्चअखेर पालिकेला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे कठीणच असल्याचे दिसून येत आहे.