औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीणमधील १६ हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 19:19 IST2021-05-14T19:16:13+5:302021-05-14T19:19:07+5:30
राज्य पोलीस दलात फौजदार पदावर सरळसेवा भरती प्रक्रियेने ५० टक्के पदे भरली जातात, २५ टक्के पदे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीद्वारे भरली जातात.

औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीणमधील १६ हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती
औरंगाबाद: २०१३ साली फौजदारपदाची विभागीय परीक्षा देणाऱ्या १०८० हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला. यात औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीण पोलीस दलातील १६ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.
राज्य पोलीस दलात फौजदार पदावर सरळसेवा भरती प्रक्रियेने ५० टक्के पदे भरली जातात, २५ टक्के पदे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीद्वारे भरली जातात. २०१३ साली पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस हवालदारांना फौजदारपदी बढती देण्यासाठी विभागीय परीक्षा घेतली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या पोलिसांना वेगवेगळ्या कारणाने पदोन्नती देण्यात आली नव्हती. यामुळे काही पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाने १२ मे रोजी राज्यातील १०८० हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. निवडसूचीसह हा निर्णय पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक यांना पाठविला.
औरंगाबाद शहरातील पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे-
संजीवकुमार सोनवणे, सुधाकर पाटील, रईसउद्दीन शेख, रमेश नरवडे, आबासाहेब गाडेकर, महेमूद पठाण, कल्याण चाबुकस्वार, निसारउद्दीन शेख, दीपक ढोणे, संजय काळे, अण्णासाहेब शेजवळ, राजेंद्र खंडागळे, सुभाष चव्हाण, कौतिक गोरे, रावसाहेब जोंधळे, हनीफ सय्यद, एकनाथ वारेे, रावसाहेब वाघ, अनवर अहेमद शेख, संजीव बहिरव, गोवर्धन चव्हाण, तातेराव लोंढे, विश्वास महाजन, दिलीप जाधव, मच्छिंद्र ससाने, लक्ष्मण वाघ, दगडू तडवी, काकासाहेब जगदाळे, मिलिंद पठारे, हेमंत सुपेकर, समियोद्दीन सिद्दिकी.
औरंगाबाद ग्रामीणमधील बढती झालेले हवालदार
सतीश बोदले, रावसाहेब बोराडे, मोहम्मद आश्रफ पठाण, बबन धनवट, दिलीप चौरे, देविदास खांडखुले, कल्याण राठोड, सीताराम महेर, मधुकर मोरे, जनार्दन मुरमे, उत्तम आवटे, बाळू कानडे, शिवनाथ आव्हाळे, काशिनाथ लुटे, सुधाकर पाडळे, जयराम ढवळे, विलास चव्हाण, प्रकाश जाधव.