जागेअभावी खाजगी कचरा संकलन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 18:57 IST2019-01-12T18:57:03+5:302019-01-12T18:57:17+5:30
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीने उपस्थित केला आहे.

जागेअभावी खाजगी कचरा संकलन रखडले
औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीने उपस्थित केला आहे.
शनिवारी कंपनीसोबत अंतिम करार करण्यात येणार आहे. पालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी या बंगळुरूच्या कंपनीकडे कचरा उचलण्याचे काम दिले आहे. आता कंपनीसोबतचा अंतिम करार शनिवारी सकाळी ११ वाजता महापौर दालनात केला जाणार आहे. सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, ३०० वाहने कंपनीला कचरा संकलन व वाहतुकीसाठी लागणार आहेत. यातील १८० रिक्षा, १० टिप्पर, ५ कॉम्पॅक्टर ही वाहने कंपनीने शहरात आणली आहेत. अद्याप या वाहनांच्या पासिंगची प्रक्रिया होणे बाकी आहे. यास आठवडाभराचा कालावधी लागणार असून, त्यानंतरच कंत्राटदार प्रत्यक्षात काम सुरू करणार आहे. कंपनीला वाहने उभी करण्यासाठी जागा कुठे द्यायची, हे अद्याप मनपाने निश्चित केलेले नाही.