समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर खाजगी बसची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:17 IST2023-07-12T14:16:19+5:302023-07-12T14:17:00+5:30
सर्व जखमी प्रवाशांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले

समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर खाजगी बसची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी
फुलंब्री : समृद्धी महामार्गावर कोलठाणवाडीनजीक बोगद्यासमोर खाजगी ट्रॅव्हल बस समोरच्या ट्रकवर धडकली. यात १९ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली. जखमी प्रवाशांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना होत आहेत. आज पहाटे सावंगीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या बोगद्यासमोर जालन्याहून मुंबईकडे जात असलेली खाजगी बस समोरील ट्रकवर धडकली. धडक जोरदार असल्याने बसचा समोरील भागाचा चुराडा झाला. यात बस चालकासह १९ प्रवासी जखमी झाले.
दरम्यान, सर्व जखमी प्रवाशांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी 12 प्रवाशांना उपचारानंतर करून सुट्टी देण्यात आली. तर उर्वरित 7 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.