औरंगाबाद घाटीतील प्रसूती विभागाची तत्त्वे देशभरात होणार लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:11 IST2018-06-15T00:09:59+5:302018-06-15T00:11:50+5:30
प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास्त्र विभाग करीत आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने ‘युनिसेफ’कडून हालचाली सुरू आहेत.

औरंगाबाद घाटीतील प्रसूती विभागाची तत्त्वे देशभरात होणार लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास्त्र विभाग करीत आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने ‘युनिसेफ’कडून हालचाली सुरू आहेत.
घाटीत ३० मे रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे उपायुक्त डॉ. दिनेश बसवाल यांनी प्रसूतीशास्त्र विभागाची पाहणी केली. प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावी, यासाठी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. अनेक अभ्यास पद्धतींचा अवलंब करून त्यांनी घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे बनविली. या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर डॉ. बसवाल यांनी या मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल तयार करून त्यासंदर्भात कागदपत्रे सादर करावी, अशी सूचना केली. या नियमावलींची पडताळणी करून ‘युनिसेफ ’ ती देशभरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्रसूतीशास्त्र विभागातर्फे मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.