शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

७९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना प्रधान सचिवांचा हिरवा कंदील

By admin | Updated: November 25, 2015 00:22 IST

बीड : जिल्हा परिषदेने पाठविलेल्या शिक्षकांच्या वाढीव पदांच्या प्रस्तावाला शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी हिरवा कंदिल दिला.

बीड : जिल्हा परिषदेने पाठविलेल्या शिक्षकांच्या वाढीव पदांच्या प्रस्तावाला शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी हिरवा कंदिल दिला. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांच्या टेबलवर गेला आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून अतिरिक्त असलेल्या ८५० हून अधिक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१३ मध्ये बृहत आराखड्यात जिल्ह्याला २२४ पूर्वप्राथमिक व ५६ प्राथमिक शाळांना मंजुरी मिळाली होती. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात धडकले. जिल्ह्यात ८ हजार ८६४ इतक्या शिक्षकांची पदे मंजूर होती. नियमबाह्य पदोन्नत्या, तालुका बदल्यांमुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा नऊशेवर गेला. तथापि, दोन ते तीन वर्षांपासून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन आॅनलाईन प्रणालीमुळे निघाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी व मूळ अतिरिक्त शिक्षकांनी दिवाळीपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले मात्र, मूळ अतिरिक्त शिक्षकांचा १५ दिवसांपासून लढा सुरुच होता. जि.प. ने शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे शिक्षकांची १०९९ वाढीव पदे देण्याची मागणी करणारा प्रस्ताव ठेवला. त्यावर त्यांनी मंगळवारी मंजुरीची मोहोर उमटवली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या स्वाक्षरीनंतर वाढीव पदांना अंतिम मान्यता मिळणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे या शिक्षणमंत्री तावडे यांना भेटल्या होत्या. या निर्णयाने शिक्षकांना मोठा फायदा होईल, असे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)