शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आराखडा तयार ठेवा

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़

नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़ येथील नियोजन भवनात शुक्रवारी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली़ यंदा लांबलेल्या पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी पाणीटंचाई, पीक पेरणी व रोजगार हमी योजनेची कामे याविषयी उपाययोजना सूचविल्या़ या बैठकीस विभागीय उपायुक्त (पुरवठा) अनिल रामोड, विभागीय उपायुक्त (महसूल), जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती़ तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़ पाणीटंचाईसंबंधी गावांची विभागणी करावी़ त्यामध्ये अतितीव्र पाणी टंचाई़ तीव्र पाणीटंचाई व काहीअंशी पाणीटंचाई अशी गावांची यादी तयार करावी़ तीन - तीन महिन्यांसाठी आराखडा तयार करावा़ त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहिरी घेणे व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे याचा प्रामुख्याने समावेश असावा़ टँकर भरण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करून ठेवावी़ टँकरच्या किती खेपा होतात तसेच भारनियमन असेल तर जनरेटर व आईल इंजिन यांचेही नियोजन करावे़ पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या़ गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागेल़ आवश्यक हातपंप बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी़ ज्या ठिकाणी विहीर व बोअर अधिग्रहण केले आहे, त्याचा दर पंधरा दिवसांनी ग्रामसभेत आढावा घ्यावा कारण पाण्याची आवश्यकता नसताना सुद्धा अधिग्रहण चालू असते, त्यासाठी पैसा गरज नसताना खर्च होतो, असेही विभागीय आयुक्तांनी सूचविले़ (प्रतिनिधी)गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल त्यांना शासनाची परवानगी घ्यावी़तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़