शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

राज्य कर्करोग संस्थेचा बांधकाम विस्तारीकरणाचा डीपीआर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 6:19 PM

विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा प्रक्रियेची अपेक्षा

ठळक मुद्दे३८.७५ कोटींचा आहे अंतिम सविस्तर अहवाल 

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकाम विस्तारीकरणाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा डीपीआर ३८.७५ कोटींचा असून, तो लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या राज्य कर्करोग संस्थेचा दर्जाप्राप्त शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या बांधकाम विस्तारीकरणासाठी ३१ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली आहे. याचे काम ‘एचएससीसी’ एजन्सीला देण्यात आले आहे. ही सुपरवायझिंग एजन्सी आहे; परंतु हा प्रस्ताव २०१५-१६ मध्ये तयार झाला होता. त्यामुळे त्याची अंदाजित रक्कमदेखील कमी होती; परंतु सध्याच्या दरानुसार दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये सादर झालेला डीपीआर ७७ कोटींवर गेला होता. त्यामुळे उर्वरित निधी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आहे त्या रकमेत अत्यावश्यक ती कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले. यामुळे विस्तारीकरणातील बांधकामाच्या स्वरूपात बदल, फर्निचरमध्ये कपात आदी गोष्टींवर रुग्णालय प्रशासनाकडून भर देण्यात आला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सुधारित डीपीआर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३८ कोटींचे प्राथमिक अंदाजपत्रक तयार करण्यात आले. आता अंतिम डीपीआर तयार झाला असून, तो ३८.७५ कोटींचा आहे. हा अंतिम डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे. हा डीपीआर बांधकाम विभागाकडून प्रमाणित केला जाणार आहे. ‘डीपीआर’नुसार शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

२६५ खाटांचे रुग्णालयनिविदा प्रक्रियेनंतर १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण करून ताबा मिळणार आहे. या विस्तारीकरणामुळे रुग्णालयात १६५ खाटा वाढतील. त्यामुळे १०० खाटांचे रुग्णालय हे २६५ खाटांचे होईल. आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी प्रशासकीय मन्यता मिळून बांधकामाची निविदा प्रक्रिया पार पडेल आणि बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारfundsनिधी