शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.


तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनासह विविध शासकीय यंत्रणांनी भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची जय्यत तयारी केली असून, तुळजापूर वासियांसह प्रशासनही भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
२५ सप्टेंबर रोजी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता घटस्थापना होऊन ब्रह्मवृंदास अनुष्ठानाची वर्णी देण्यात येणार आहे. रात्री छबीना मिरवणूक होणार आहे. २६ व २७ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबीना होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी ललीता पंचमी, नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. २९ रोजी नित्योपचार पूजा व मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना. ३० रोजी नित्योपचार पूजा शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना. १ आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा व भवानी तलावार अलंकार महापूजा व रात्री छबीना असे कार्यक्रम होणार आहेत.
२ आॅक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त नित्योपचार महापूजा होऊन महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ७ वाजता वैदिक होमास व हवनास प्रारंभ होऊन दुपारी १२.१० वाजता पूर्णाहुती तर रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी महानवमीनिमित्त नित्योपचार पूजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी पार पडणार आहे. यानंतर घटोत्थापना होऊन सायंकाळी सार्वत्रिक सिमोल्लंघन, शमीपूजन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ४ आॅक्टोबर विजयादशमी (दसरा) असून, या दिवशी उष:काली श्रीदेवीजींचे शिबिकारोहन, सीमोल्लंघन मंदिराभावेती मिरवणूक झाल्यानंतर देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. यानंतर ७ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेदिवशी रात्री भवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, ८ रोजी मंदिर पोर्णिमा नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबीना मिरवणूक तर ९ आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबीना मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. नारनवरे यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
आई राजा उदोऽ उदोऽऽचा जयघोष करीत हलगी, ताशा, ढोल, लेझीम, झांजपथकांच्या गजरात हजारो भाविक बुधवारी भवानी ज्योत घेऊन तुळजापूर शहरात दाखल झाले. भाविकांनी येथील बसस्थानक परिसर, शिवाजी चौक ते महाद्वार चौक, भवानी रोड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरात वाहनधारकांना प्रवेशबंदी केली. सर्व प्रमुख रस्त्यांच्या तोंडावर बॅरिगेटींग बसवून नाकाबंदी करण्यात आली. तसेच महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. बुधवारी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला राज्याच्या तसेच परराज्यातील हजारो भाविक आपापल्या मंडळासमवेत देवी दर्शनासाठी तसेच भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठीी दाखल झाले. मंडळाच्या नावाचे बॅनर, देवीचा फोटो, टी-शर्ट, कपाळी डोकी पट्टा, सोबत वाद्याचा गजर यासह भाविक तुळजापुरात दाखल होत होते. मंगळवारी रात्रीनंतर बीड, अहमदनगर, जालना, अमरावती, अकोला, जळगाव, औरंगाबाद आदी ठिकाणाहून युवक भाविक भवानी ज्योतीसह तुळजापुरात दाखल झाले. यामुळे बुधवारी पहाटेपासूनच उस्मानाबाद रोडवर दुतर्फा वाहनांच्या रांगा दिसून आल्या. बार्शी, सोलापूर, पुणे, विजापूर या भागातून येणाऱ्या भाविकांमुळे आराधवाडी, घाटशीळ परिसर गर्दीने फुलला होता. दुपारी चार वाजेनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे दिसून आले. वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पोलीसांनी प्रमुख रस्त्यावर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी केली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान-मोठ्या हॉटेलमध्ये गर्दी झाली होती. तसेच प्रासादिक दुकानेही भाविकांच्या गर्दीमुळे गजबजली होती. रस्त्याच्या कडेला बांगड्या विकणाऱ्या महिलांकडेही बांगड्या खरेदीसाठी महिला भाविकांची गर्दी झाली होती.