शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

कारखान्यांमध्ये पूर्वतयारी; पहिल्या टप्प्यात ५ हजार कामगारांवर सुरू होतील उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:40 PM

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत.

ठळक मुद्दे५० दिवसांहून अधिक काळ होते बंद एमआयडीसीकडून आॅनलाईन पासचे वाटप

औरंगाबाद : चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कारखाने सोमवारपासून  पूर्ण ताकदीनिशी सुरू होतील. सध्या कामगारांना बस किंवा चारचाकीमधून येण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत आॅनलाईन पास दिले जात असून आठवडाभरात दुचाकीवर ये-जा करण्यासाठीदेखील परवानगी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

महापालिका प्रशासनाने या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू करण्यास बुधवारी रात्री उशिरा अनुमती दर्शवली. त्यानंतर काल गुरुवारपासून उद्योजकांनी ‘एमआयडीसी’च्या पोर्टलवर उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणारे आॅनलाईन अर्ज केले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत. ‘एमआयडीसी’नेही तत्परता दाखवत कालपासूनच उद्योजकांना परवानगी व कामगारांना कारखान्यांमध्ये ये-जा करण्यासाठी पास वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. 

तथापि, महापालिका प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविल्यानंतर काल गुरुवारपासून या दोन्ही औद्योगिक परिसरातील उद्योगांनी यंत्रांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंंगची व्यवस्था, डिजिटल थर्मल स्क्रीनिंग आदी पूर्वतयारी सुरू केली आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये शुक्रवारी हा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे शुक्रवारीही कारखाने व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही औद्योगिक  परिसरातील कारखान्यांमध्ये एकूण ३० ते ३५ हजार कामगार आहेत. त्यानुसार परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात साधारणपणे साडेचार ते पाच हजार कामगारांवर उद्योग सुरू केले जातील.  दुसऱ्या टप्प्यात दुचाकीवर येण्याची परवानगी  मिळाल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी या परिसरातील सर्व उद्योग सुरू होतील, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.

पूरक उद्योग आणि पॅकेजिंगचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत बजाज, व्हेरॉकसारख्या मोठ्या उद्योगांना सुटे भाग पुरविणारे पूरक उद्योग, पॅकेजिंग, इंजिनिअरिंग, औषधी कंपन्यांची संख्या अधिक आहे. गरवारे, वोक्हार्ट असे मोठे उद्योगही आहेत, तर रेल्वेस्टेशन परिसरात इंजिनिअरिंग, स्टेशनरी, वायरिंग उत्पादन करणारे उद्योग आहेत. मागील ५० दिवसांहून अधिक काळ हे उद्योग बंद होते. उशिरा का होईना, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे उद्योजक व कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी