परभणीत अतिसार नियंत्रण पंधरवडा

By Admin | Updated: July 27, 2014 01:10 IST2014-07-26T23:44:41+5:302014-07-27T01:10:07+5:30

परभणी : २८ जुलै ते ८ आॅगस्ट या काळात परभणी येथे अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा केला जाणार आहे़ यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले़

Pregnancy Diarrhea Control Fortnight | परभणीत अतिसार नियंत्रण पंधरवडा

परभणीत अतिसार नियंत्रण पंधरवडा

परभणी : २८ जुलै ते ८ आॅगस्ट या काळात परभणी येथे अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा केला जाणार आहे़ यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले़
यासंदर्भात जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले़ दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे़ त्यात २८ जुलै ते २ आॅगस्ट या काळात जनजागृती केली जाणार आहे़ त्यानंतर ४ ते ८ आॅगस्ट या कालावधीत बालकांचे स्तनपान, शिशुपोषण या विषयावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे़ अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंकची प्रात्यक्षिके, आशा कार्यकर्तीमार्फत घरगुती भेटीमध्ये ओआरएसचे वितरण, कुपोषित बालके शोधून त्यांच्यावर उपचार आदी उपक्रम राबविले जाणार आहेत़
कार्यक्रमासाठी आवश्यक तो औषधीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शंकरराव देशमुख यांनी दिली़ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे व उपजिल्हाधिकारी संभाजी झावरे यांनी केले आहे़ अतिसार नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन नियोजन करण्यात आले़
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉफ़डनिस, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ एम़ टी़ जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ़ कल्पना सावंत, नोडल आॅफिसर डॉ़ सुभाष पवार आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Pregnancy Diarrhea Control Fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.