महात्मा बसवेश्वरांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:50 IST2019-05-07T23:49:10+5:302019-05-07T23:50:57+5:30
औरंगाबाद : जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मंगळवारी (दि.७) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर चौकात (आकाशवाणी) ...

महात्मा बसवेश्वरांचा जयघोष
औरंगाबाद : जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मंगळवारी (दि.७) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर चौकात (आकाशवाणी) सकाळी ध्वजवंदन केल्यानंतर वाहन रॅली काढण्यात आली, तर सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हर हर महादेव,’ अशा जयघोषांनी शहर दुमदुमून गेले.
महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समिती आणि शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे सकाळी महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे अंबादास दानवे, समितीचे अध्यक्ष अमोल हुंडीवाले, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रभाकर पटणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास नगरसेवक सचिन खैरे, उद्योजक बसवराज मंगरुळे, भरत लकडे, देवीदासअप्पा उंचे, शिवा खांडखुळे, विलासअप्पा सांभाहरे, गणेश कोठाळे, शिवानंद मोधे, नितीन माठे, राहुल गवंडर, प्रतीक मेने, मनोज गवंडर, आशिष लकडे, शेखर कोठुळे, सागर कळसने, अमोल मिटकरी, ओंकार स्वामी, गणेश कोठाळे, परशुराम मोधे, दीपक उरगुंडे आदींची उपस्थिती होती.
युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
ध्वजारोहणानंतर समितीतर्फे वाहन रॅली काढण्यात आली. चारचाकी वाहनातील महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य प्रतिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवक- युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गजानन महाराज मंदिर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, बळीराम पाटील चौक, एम-२ मार्गे टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर रॅलीचा समारोप झाला.
शिवा संघटनेतर्फे अभिवादन,
मोटारसायकल रॅली
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे सकाळी ९ वाजता आकाशवाणीयेथे अभिवादन सोहळा घेऊन ध्वजवंदन करण्यात आले. प्रा. मनोहर धोंडे अध्यक्षस्थानी होते. सोमेश्वरअप्पा हळीघोंगडे, रामेश्वरअप्पा लांडगे, वीरभद्र वनशेट्टी, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, चंद्रकांत सुतार, शिवदास तोडकर, उमेश दारूवाले, तुकाराम सराफ, अनिता चिकाळे आदींची उपस्थिती होती. यानंतर शिवा संघटनेतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. मोंढा नाका, क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे टीव्ही सेंटर येथे रॅलीचा समारोप झाला.
एकसमान वागणुकीची शिकवण -पालकमंत्री
यावेळी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी समाजात परिवर्तन घडविले. अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करून परिवर्तनवादाची, समाजप्रबोधनाची अणि सगळ्यांना एकसमान वागणुकीची शिकवण दिली.