छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीत १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे याच्या हत्येचे मारेकरी निष्पन्न करण्यात पोलिसांना तिसऱ्या दिवशी अखेर यश आलेे. प्रदीपचे मित्र व संपर्कातील तरुणांची १२ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली. त्याशिवाय, गेल्या तीन महिन्यांतील त्याच्या कॉल रेकॉर्डिंगच्या तपासावरही पोलिसांनी भर दिला. त्यातून रूममेट मित्रानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे.
मंगळवारी प्रदीपची हत्या झाली. सायंकाळी ६ वाजता त्याच्यासोबत राहणारी मुले विविध कारणांखाली बाहेर गेली होती. तेव्हा प्रदीप एकटाच घरात होता. मित्रांनी जाताना दरवाजा केवळ ओढून घेतला. परिणामी, मारेकऱ्याने थेट घरात घुसून प्रदीपवर १७ वार करून क्रूर हत्या केली. याच मुद्द्यावर पोलिसांचा अजूनही संशय आहे. त्यामुळे बुधवारी व गुरुवारी दोन्ही संपूर्ण दिवस त्याचे मित्र, परिचयातील व्यक्तींकडून प्रश्नांची उत्तरे मिळविण्याच्या पोलिस प्रयत्न करीत होते. प्रदीप पूर्वी राहत असलेल्या दशमेशनगरमधील जुन्या रूम पार्टनर्सची गुरुवारी चौकशी केली. तो तेथे राहत असताना कोणाच्या संपर्कात आला, कोणाशी बोलत होता, याचीदेखील फेरतपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तीन महिन्यांचे सीडीआर तपासावरपोलिसांचा संपर्कातील व्यक्तींच्या दृष्टीने तपास सुरू असतानाच मारेकऱ्याने मोबाइल नेल्यामुळे लूटमारीच्या दृष्टीने तपास सुरू आहे. प्रदीपच्या गेल्या तीन महिन्यांतील कॉल डिटेल्सचे विश्लेषण सुरू करण्यात आले. त्यात तो सर्वाधिक संपर्कात असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले. दरम्यान, गुरुवारी आठ जणांचा जबाब नोंदविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कसा सुरू आहे तपास?- पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांनी सकाळीच निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला.- सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्रदीपच्या मित्रांची चौकशी केली.- सिडको, एमआयडीसी सिडको, पुंडलिकनगर, जवाहरनगर, सातारा ठाण्याचे डीबी पथक, गुन्हे शाखेची तीन पथके तपासकामी नियुक्त.
जवळच्यांच्या चौकशीवर भर, मित्रच निघाला खूनीपोलिसांचा तपास मुख्यत्वे परिचयातील व लूटमारीच्या मुद्द्यांवर असला तरी पथकांच्या गुरुवारच्या चौकशीचा सर्वाधिक भर प्रदीपच्या जवळच्यांवरच होता. मारेकरी जवळचाच आहे का, याच मुद्द्याभोवती पोलिसांचा तपास सुरू होता. यातूनच एका रूम पार्टरनेच हत्या केल्याचे ठोस पुरावे मिळाले असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची माहिती आहे.