शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्रे होणार-पालकमंत्री

By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST

अंबड: जिल्ह्यात अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही.ए.ची दोन तर अंबड व घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी ३३ के.व्ही.ए.च्या चार उपकेंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

अंबड: जिल्ह्यात जालना तालुक्यातील डांबरी व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही.ए.ची दोन तर अंबड व घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी ३३ के.व्ही.ए.च्या चार उपकेंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. १०० के.व्ही.ए.च्या अंबड तालुक्यासाठी २१०, घनसावंगी तालुक्यासाठी २००, मंठा तालुक्यासाठी १६४, परतुर तालुक्यासाठी २०४ असे एकूण ७७८ ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी अंबड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात मोठे वीजसंकट निर्माण झालेले आहे. वीजटंचाई निवारणार्थ राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात राबविण्यात येणाऱ्या इन्फ्रा २ योजनेअंतर्गत जिल्ह्यात जालना तालुक्यातील डांबरी व घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही. तर अंबड तालुक्यातील चंदनापुरी, घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी, बानेगांव, भुतेगाव अशा चार ठिकाणी ३३ के.व्ही.ची चार सबस्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. ३३ के.व्ही.ए.ची एच.टी.लाईन १३० किलोमीटर, ११ के.व्ही.ए.ची लाईन ६०० किलोमीटर, शेतकऱ्यांसाठीची एल.टी.लाईन १२०० किलोमीटर अशी मोठ्या प्रमाणावर विजेची उभारणी करण्यात येणार आहे. २०१२ पर्यंतच्या वीजपंपांसाठीे अंबड तालुक्याला २४० तर घनसावंगी तालुक्याला ३०० वीज कनेक्शन मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी टोपे यांनी दिली. राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून वंचित असणाऱ्या नागरिकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यादृष्टीने पुनर्सर्वेक्षण करुन केशरी व पिवळया रेशन कार्डचे वाटप करण्यात येणार आहेत. संभाव्य दुष्काळ लक्षात घेऊन तालुकास्तरीय वैरण विकास कार्यक्रमांना चालना देण्यात येणार आहे, टंचाईच्या दृष्टीने १ कोटी ३८ लाख रुपयांचा नवीन पुरवणी आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून याव्दारे नवीन विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, खोलीकरण करणे, विहीर अधिग्रहरण करुन टँकर सुरु करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीत कामे नसल्याने रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी पालकमंत्री टोपे यांनी दिली. (वार्ताहर)