पॉवर लिफ्टिंगचा चॅम्पियन पंजाबच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे औरंगाबादमध्ये निधन
By राम शिनगारे | Updated: January 18, 2023 19:05 IST2023-01-18T19:01:36+5:302023-01-18T19:05:35+5:30
यापूर्वीही बब्बर यांना ह्रदयविकाराच्या धक्का आला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

पॉवर लिफ्टिंगचा चॅम्पियन पंजाबच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे औरंगाबादमध्ये निधन
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी आलेल्या पॉवरलिफ्टिंमधील आंतरराष्ट्रीय खेळाडूचे सेव्हन हिल परिसरातील हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
प्रदीप बब्बर (रा. दशमेशनगर, जालंधर, पंजाब) असे मृत खेळाडूचे नाव आहे. बब्बर हे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १२ वेळेस तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चार वेळेस चॅम्पियन ठरले आहेत. मंगळवारी दिवसभर विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित होते. सेव्हन हिल परिसरातील हॉटेलमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याठिकाणी झोपेत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना जवळील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी तपासून मृत घोषीत करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगरच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी बब्बर थांबलेल्या खोलीत भेट देत पंचानामा केला. यापूर्वीही बब्बर यांना ह्रदयविकाराच्या धक्का आला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.