शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा सहा लाखांनी लोकसंख्या वाढली

By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST

अनुराग पोवळे , नांदेड सद्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणात कमी झालेला नाही़

अनुराग पोवळे , नांदेडलोकसंख्या नियंत्रणासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली असली तरी सद्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणात कमी झालेला नाही़ याबाबीस काही अंशी समाजातील पुरूषांचा न मिळणारा सहभाग हे एक कारण आहे़ जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर २ पेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या ३० ते ३५ वर्षात दुप्पट होणार आहे़ जिल्ह्यात २०१० मध्ये २८ लाख ५४ हजार २५९ लोकसंख्या होती़ तीच लोकसंख्या २०११ मध्ये ३३ लाख ३० हजार ९९४ वर पोहोचली़ २०१२ मध्ये ३४ लाख ४१ हजार ९४९, २०१३ मध्ये ३५ लाख ८९ हजार ६१३ आणि २०१४ मध्ये आजपर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या ही ३४ लाख ९० हजार ३८ इतकी झाली आहे़ जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही मुखेड तालुक्यात आहे़ त्यात ३ लाख १० हजार ८८८, हदगाव २ लाख ७१ हजार १७१, कंधार २ लाख ६० हजार ६८५, किनवट २ लाख ५७ हजार ९१०, लोहा २ लाख ५२ हजार ७६४, देगलूर २ लाख ३६ हजार ७५१, नायगाव १ लाख ८९ हजार ८५९, बिलोली १ लाख ५७ हजार ४७४, भोकर १ लाख ४४ हजार ६८७, मुदखेड १ लाख २१ हजार २२०, हिमायतनगर १ लाख १५ हजार ६५०, अर्धापूर १ लाख १२ हजार ७०३, माहूर १ लाख ४ हजार ५१२, उमरी १ लाख ३ हजार ८ आणि धर्माबाद तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३ १६ इतकी झाली आहे़ लोकसंख्या नियंत्रणासाठी २००० मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण निश्चित केले आहे़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यातही लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्याचा जन्मदर हा १७़३ वर आणणे, मृत्यूदर हा ६़४ वर तर अर्भक मृत्यू जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेला दिसून येत नाही़ १९५२ पासून कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविला जात आहे़ लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात २७ जून ते १० जुलै या कालावधीत दांम्पत्य संपर्क पंधरवडा राबविण्यात आला़ तर ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीत दांम्पत्य स्थिरता पंधरवडा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे़ या कालावधीत जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभा घेण्यात येणार आहे़ ११ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अर्थात ६५ गावांमध्ये ग्रामसभा होणार आहे़ पहिल्यांदाच आरोग्य विषयक बाबींसाठी ग्रामसभा होणार आहेत हे विशेष़ या ग्रामसभेमध्ये सर्व आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी सांगितले़ जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालयामध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्त्री व पुरूष शस्त्रक्रिया तसेच तांबी शिबीरे घेणे याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यात ७२८ स्त्री शस्त्रक्रिया, २४८ पुरूष शस्त्रक्रिया आणि १ हजार ३७५ तांबी बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यासाठी ४६ शस्त्रक्रिया गृह असून त्यात ७२ सर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे़ शहरी लोकसंख्येत दिवसेंदिवस भरच़़़चार वर्षांचा विचार करता जिल्ह्याच्या लोकसंख्येत ६ लाख ३५ हजार ७७९ ची भर पडली आहे़ जिल्ह्यात आजघडीला सर्वाधिक ७ लाख ५० हजार ४४१ लोकसंख्या ही नांदेड तालुक्याची आहे़ त्यातही नांदेड शहराच्या लोकसंख्येचा आकडा मोठा आहे़ २०१० मध्ये नांदेडची लोकसंख्या ५ लाख ९१ हजार ३०५ होती़ चार वर्षात त्यात १ लाख ५९ हजार १४४ इतक्या लोकसंख्येची भर पडली आहे़