शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यांअभावी पूल धोकादायक

By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याठिकाणी आता कठड्यांचे पाईप शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी असलेले कठडे कोणत्याच पुलावर राहिले नसल्याने कठड्याविना पूल धोकादायक बनले आहेत. कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिले आहे. वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फूट पाणी वाहत असते. हा रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यातही त्याठिकाणी मोठी वर्दळ असते. पाण्याच्या प्रवाहापासून धोका टाळण्यासाठी असलेले कठडेच शिल्लक राहिले नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. काही महिन्यांपूर्वी कठड्यांअभावी कौठा पुलावरून एक दुचाकीस्वार खाली कोसळून मरण पावल्याची दुर्घटना घडली. या भागात अनेक पुलांवर असलेले सिमेंटचे कठडे निकृष्ट कामामुळे कोसळले आहेत. लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे उत्कृष्ट कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावेत. जेणेकरून ते कठडे गायब होणार नाहीत, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करीत आहेत. परंतू कठड्यांच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. औंढा व वसमत महामार्गावरील अनेक पुलाचे कठडे कुचकामी ठरले आहेत तर लोखंडी कठडे गायब झाले आहेत. या भागातील कुरूंदा, कौठा, आंबा, वसमत रस्त्यावरील आसना नदीवरील पुलांना कठडेच नसल्याने पावसाळ्यात हे पूल अधिक धोकादायक ठरत आहेत. या चारही ठिकाणच्या नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असतात. याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलांवर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी संरक्षक कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केले आहेत पुलावर केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिला आहे वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फुट पाणी वाहत असते. पुलावरून ये-जा करताना पादचार्‍यांसह वाहनधारकांच्या बचावासाठी संरक्षक कठडे बसविण्यात येतात कुरूंदा भागात चार ठिकाणच्या नदीवर बसविलेले कठडे अनेक दिवसांपासून गायब आहेत पूल धोकादायक बनले आहेत