शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 7:08 PM

संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे.

औरंगाबाद : सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर; परंतु या शहरातील रसिक श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागविणारी नाट्यगृहे आज उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. प्रामुख्याने संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे, ना शासन-प्रशासनाचे. 

तब्बल वर्ष-दीड वर्षापासून संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी १५ आॅगस्ट रोजी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले केले जाणार होते; पण अजूनही हे नाट्यगृह भग्नावस्थेत पडून आहे. या नाट्यगृहामध्ये खुर्च्या बसविण्यात आलेल्या नाहीत. स्वच्छतागृहे दुरुस्त केलेली नाहीत. या नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल नाट्यकलाकार प्रशांत दामले व सुमित राघवन यांनी गेल्या वर्षी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व सरकारचे वाभाडे काढले होते.

सुमित राघवन आणि टीम ‘एक शून्य तीन’ या नाटकाच्या प्रयोगासाठी संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली होती. तेव्हा रंगमंदिराची दुरवस्था पाहून ते अत्यंत व्यथित झाले. रंगमंचावरील मोडक्या लाकडी फळ्या, फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, मेकअप रूममधील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे त्यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. त्यावेळी सुमित राघवनने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रंगमंदिराचे विदारक चित्र जगासमोर मांडले होते. त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

महापालिकेने यात ५० लाख रुपयांची भर घातली. अडीच कोटी रुपयांमधून नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात आता वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 

खाजगी संस्थेकडे देण्याचा घाटसिडकोतील नाट्यगृहाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. सिडकोने २०१० मध्ये मनपाकडे नाट्यगृह हस्तांतरित केले. त्यानंतर महापालिकेने या नाट्यगृहाचे संत तुकाराम महाराज नाट्यगृह असे नामकरण केले. आता महापालिकेला हे नाट्यगृह सांभाळणे जड झाले आहे. त्यामुळे ते खाजगी संस्थेकडे देण्याचे षङ्यंत्र रचले जात आहे. या नाट्यगृहाची महापालिकेकडून नियमित देखभालही होत नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा बंद पडलेली, तुंबलेली स्वच्छतागृहे, सिलिंग कोसळलेले, ग्रीन रूमची वाट लागलेली, असे भयाण चित्र नाट्यगृहात पाहायला मिळते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद