शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पोलिसांनी समाजकंटकांचा डाव उधळला, दिवस उजाडण्यापूर्वी व्हायरल व्हिडीओचे सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 11:23 IST

सावधान ! समाजकंटक सक्रिय; मध्यरात्रीनंतर हायहोल्टेज ड्रामा

औरंगाबाद : शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक सक्रिय बनले आहेत. घटना घडलेलीच नसताना त्याचा संबंध धर्माशी जोडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास गुरुवारी मध्यरात्रीनंतर भाग पाडले. ही अचानक उद्भवलेली परिस्थिती शहर पोलिसांनी अतिशय कौशल्याने हाताळत दिवस उजाडण्यापूर्वीच दोन्ही घटनांतील सत्य समोर आणल्यामुळे मोठे संकट टळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२.३५ वाजता शहरणापूर फाटा येथील गिरीजा पेट्रोल पंप परिसरात दुचाकीवरून आलेले १५ ते १८ वयोगटातील तरुण सेल्फी घेत होते. त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तेव्हाच एक दुचाकीवरून खाली पडला. त्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. तेव्हा घटनास्थळी आरडओरड सुरू झाली. जमाव जमण्यास सुरुवात झाल्यानंतर, त्याचवेळी जवळून एक चारचाकी गाडी खुलताबादकडून येत होती. त्या गाडीतील लोकांनी मारहाण केली. गर्दी जमा झाल्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि व्यवस्थापकाने भांडणे मिटवली. जखमीला घाटीमध्ये पाठवून देण्यात आले.

त्यानंतर शरणापूर फाट्यावर युवकांमध्ये वाद झाला असून, मुस्लीम युवकांना ‘जय श्रीराम’च्या नावाने घोषणा देण्यास भाग पाडत मारहाण केल्याची अफवा पसरविण्यात आली. जखमीला घाटी रुग्णालयात आणल्याच्या या अफवेमुळे मोठा जमाव रात्री दीड वाजेनंतर घाटीत जमा होऊ लागला. इकडे पोलिसांची यंत्रणाही अलर्ट होती. घाटीमध्ये जमलेल्या जमावाने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांची अधिकची कुमक मागवली. पहिल्या घटनेत एकाच समाजातील सर्व युवक असल्याचे पोलिसांनी काही वेळातच समोर आणले. त्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजसह उपस्थितांचे व्हिडिओ काढण्यात आले. अफवा पसरविण्यात आल्याचा उगमही सायबर पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली होती. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

पहिली अफवा संपताच दुसरा व्हिडिओ तयारशरणापुर येथील घटनेतील सत्य समोर आणण्यास पहाट उजाडली. त्याचवेळी सिडको ठाण्याच्या हद्दीतील इम्रान नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला. हा व्हिडिओ घाटी परिसरातच चित्रित केला होता. या व्हिडिओत आंबेडकरनगरातील राहुल नावाच्या व्यक्तीसह इतर १५ लोकांनी ‘जय श्रीराम’ बोलण्यास भाग पाडल्याचे युवक बोलत होता. हा व्हिडिओ पोलिसांकडे येताच पुन्हा यंत्रणा सक्रिय झाली. व्हिडिओचे चित्रीकरण घाटीत झाल्यामुळे व्हिडिओ शूट करणाऱ्यासह जखमी शोधून काढला. हा जखमी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांच्या पथकांनी त्याचे घर शोधून काढले. त्याला बोलते करीत हा व्हिडिओची सत्यता तपासणे सुरू केले. तेव्हा त्याने घाटीतील काही समाजकंटकांनी आपणास तसे बोलण्यास भाग पाडल्याचे सांगितले. जखमीसह त्याच्या भावाचा सत्य घटनेवरील व्हिडिओ तयार करून सगळीकडे पोलिसांनी व्हायरल केला. या घटनेत वाईन शॉपीसमोर जखमी व्यक्तीला चोर असल्याचे समजून ओळखीच्या व्यक्तीनेच मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यास तो सिडको ठाण्यात गेला होता. तेव्हा त्यास घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. घाटीत उपस्थित जमावातील समाजकंटकांनी त्याला चुकीचा बाईट देण्यास सांगितल्याचेही पोलिसांनी उघडकीस आणले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन्ही घटना अफवाच असल्याचे पोलिसांनी सत्य समोर आणले.

सतर्क पोलिसांमुळे टळला अनर्थशरणापूर फाटा येथे युवकांमध्ये वाद सुरू झाल्याची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी ११२ नंबरवरून पोलिसांना दिली. तेव्हा दौलताबादच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासह सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण पथकासह तत्काळ पोहोचले. अफवामुळे जमाव घाटीत जमल्याचे समजताच उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, क्रांती चौकचे डॉ. गणपत दराडे, बेगमपुराचे प्रशांत पोतदार, उस्मानपुऱ्याच्या गीता बागवडे यांच्यासह इतर अधिकारी दाखल झाले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सर्व यंत्रणेला सतर्क करीत योग्य ते मार्गदर्शन केले. त्यामुळे उजडण्यापूर्वी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.

कडक पावले उचलण्यात येत आहेत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करतील. रात्री घडलेल्या प्रकारातील समाजकंटकांची ओळख पटविण्यात येत आहे. त्याच्याविरोधातही कडक पावले उचलण्यात येत आहेत.- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस