शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकातील पोलीस लाच घेताना पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 23:55 IST

बीड : दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता दिला नाही तर प्रत्येक रेडमध्ये आरोपी करीन, अशी धमकी देऊन तीन मटकाचालकांकडून

बीड : दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता दिला नाही तर प्रत्येक रेडमध्ये आरोपी करीन, अशी धमकी देऊन तीन मटकाचालकांकडून पैसे घेऊन आलेल्या एका व्यक्तीकडून ते स्वीकारताना उपविभागीय अधिकारी यांच्या पथकप्रमुखास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी पकडले. मुरली नायबा गंगावणे असे त्या लाच घेताना पकडलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो सध्या उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांच्या विशेष पथकाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. १७ डिसेंबर रोजी धानोरा रोड येथे उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने मटका अड्ड्यावर धाड टाकून दीपक खोड यास पकडले. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात नोंद केली. विशेष पथकातील गंगावणेच्या सांगण्यावरून तक्रारदार यांचे नाव आरोपी म्हणून घातले. त्याबाबत गंगावणेने तक्रारदार बाळू जिजाबा मस्के यांच्याकडे निरोप दिला की, नितीन खोड, बाळासाहेब जाधव व सुरेश जटावाले यांनी मला दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता द्यावा. अन्यथा मी नितीन खोड यांना आरोपी केल्याप्रमाणे जाधव व जटावाले यांनाही अशा प्रकारे केस दाखवून प्रत्येक धाडीमध्ये आरोपी करीन, असे सांगितले. सदरच्या तक्रारीवरून मंगळवारी बार्शी रोडवरील एका हॉस्पिटलजवळ पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, तक्रारदार बाळू मस्के यांच्याकडे ३० हजार रूपये देण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचला असता मुरली गंगावणे यास बाळू मस्के यांच्याकडून ३० हजार रूपये लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडले. गंगावणेविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पो. नि. गोंदकर, गजानन वाघ, पो.हे.काँ. श्रीराम खटावकर, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ यांनी केली. (प्रतिनिधी)