शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘पोलिसराज मुर्दाबाद,दडपशाही मुर्दाबाद’; विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्यार्थी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 15:02 IST

औरंगाबाद शहरात सलग दोन दिवस विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते.

ठळक मुद्देशैक्षणिक बंदला पोलिसांनी परवानगी नाकारली

औरंगाबाद : जामिया इस्लामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात औरंगाबाद शहरात शैक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. मात्र, शहरातील महाविद्यालयांमध्ये पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावून विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जमा होऊन पोलिसांसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

केंद्र शासनाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी, नागरिक एकवटले आहेत. या विधेयकास विरोध करणाऱ्या जामिया इस्लामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी बेकायदा घुसखोरी करून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्याशिवाय गोळीबारही करण्यात आला. या अत्याचाराचे पडसाद देशभरातील विद्यापीठांमध्ये पडले आहेत. औरंगाबाद शहरात सलग दोन दिवस विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते. 

या विरोधात पोलिसांनी विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी सायंकाळीच नोटिसा देऊन शैक्षणिक बंद करण्यास परवानगी नाकारली होती. तसेच शहरातील देवगिरी, सरस्वती भुवन, मौलाना आझाद, विवेकानंद महाविद्यालयाच्या समोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलाना आझाद महाविद्यालय, रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नागसेनवनातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेशद्वारावर जमा होण्याचे आवाहन केले. यास उत्तम प्रतिसाद मिळाला. शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रवेशद्वारावर एकत्र येऊन महाविद्यालयातील तासिका बंद पाडल्या. यामुळे वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक बंद पाळण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी ‘पोलिसराज मुर्दाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो, संघर्षो से आदी है हम आंबेडकरवादी है, संविधान के सन्मान में छात्रशक्ती मैदान में, एआरसी-सीएटी चलेजाव, संघवाद मुर्दाबाद, दडपशाही मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पँथर्स रिपब्लिक विद्यार्थी आघाडी, एसएफआय, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, स्टुडंटस् इस्लामिक आॅर्गनायझेशन, आझाद युवा ब्रिगेड, एसडीपीआय, मुस्लिम युथ फोरमने सहभाग नोंदविला.

ज्युबिली पार्क ते विद्यापीठगेट निषेध रॅलीनवखंडा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत निषेध रॅली काढली. यात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यात महाविद्यालयांचे प्राध्यापकही सहभागी झाले होते. ज्युबिली पार्क, घाटी, पाणचक्कीमार्गे ही रॅली विद्यापीठ प्रवेशद्वारावर पोहोचली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीagitationआंदोलन