नांदेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:37 IST2018-07-19T16:36:18+5:302018-07-19T16:37:44+5:30
आज सकाळी तालुक्यातील धानोरा माळकू येथे राज्य महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नांदेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारलेल्या दूध आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यात आजही सुरूच आहेत. आज सकाळी तालुक्यातील धानोरा माळकू येथे राज्य महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनावर आद्याप तोडगा निघाला नाही, त्यातच खा.राजू शेट्टी यांनी गुरुवारी रास्ता रोकोची हाक दिल्याने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नांदेड तालुक्यातील धानोरा माळकू येथील तळणी फाटा येथे आंदोलकांनी बैलगाड्या आणि जनावरे राज्य महामार्गावर लावत महामार्ग अडवला. परंतु; पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तत्काळ रास्ता मोकळा केला व नरहरी पोपळे ,अरुण पोपळे, एकनाथ पोपळे ,रमेश पोपळे,सूर्यकांत पोपळे या आंदोलकांना अटक केली.