छत्रपती संभाजीनगर: येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पुन्हा एकदा आयर्न मॅन किताब पटकावला. व्हिएतनाममधील फुकॉक येथे रविवारी झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत ६ तास ५९ मिनिटे आणि ५० सेकंद असा वेळ नोंदवत त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम नोंदवत तिसऱ्यांदा आर्यन मॅन किताबावर नाव कोरले.
जगभरातील अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आयर्न मॅन या स्पर्धेचा समावेश होत असतो. स्पर्धकांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा खूप कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात. फुकॉक येथे भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ४. ३५ वाजता ही स्पर्धा सुरू झाली. समुद्रात दोन किलोमीटर पोहणे (५२.२३ मिनिटे) , ९० किलोमीटर सायकलिंग (३ तास २१ मिनिटे ती सेकंद) आणि २१ किलोमीटर धावणे (२ तास ३४ मिनिटे २९ सेकंद ) ही कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. गुरमे यांनी याआधी सन २०२२ आणि २३ मध्ये सलग दोन वर्षे इस्टोनिया मधील टल्लीन येथील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आयर्न मॅन किताब पटकावला होता.
पो.नि. संदीप गुरमे हे सध्या जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. एक सक्षम पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. ते एकेकाळचे गुणवत्ताप्राप्त एनसीसी कॅडेट होते. अॅथलेटिक्सची त्यांची आवड त्यांनी बालपणापासून जपलेली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये गुरमे यांनी विरळ ऑक्सिजन असलेल्या मनाली ४००० फूट उंची ते लेह लडाख खारदूगला १८००० फूट उंचीवर ५५० किमी सायकलिंग करण्याचा विक्रम नोंदविला आहे. तिसऱ्यांदा आर्यन मॅन किताब पटकावल्याबद्दल जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर यांच्यासह पोलिस खात्यातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि मित्रमंडळींनी त्यांचे स्वागत केले.
Web Summary : Police Inspector Sandeep Gurme secured his third 'Iron Man' title in Vietnam, completing the challenging race in 6 hours, 59 minutes. He conquered a 2km swim, 90km cycling, and a 21km run. Gurme, known for his athletic prowess, previously won in Estonia and excels as a police officer.
Web Summary : पुलिस इंस्पेक्टर संदीप गुरमे ने वियतनाम में 6 घंटे, 59 मिनट में दौड़ पूरी कर तीसरी बार 'आयरन मैन' खिताब जीता। उन्होंने 2 किमी तैराकी, 90 किमी साइकिलिंग और 21 किमी दौड़ पूरी की। गुरमे ने पहले एस्टोनिया में जीत हासिल की और एक पुलिस अधिकारी के रूप में उत्कृष्ट हैं।