शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:13 IST

तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली होती

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी खून प्रकरणांतील आरोपींना त्यांच्या अटकेची लेखी प्रत न दिल्याने न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचा अनुभव पाठीशी असताना शहर पाेलिसांनी सलग दुसऱ्यांदा आरोपींच्या अटकेसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने रविवारी बनावट नोटाप्रकरणी अटकेतील चौथ्या आरोपीला न्यायालयाने रविवारी जामीन मंजूर केला.

राजन अशोक ब्राह्मणे (रा.सोनगाव, ता. राहुरी, अहिल्यानगर) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १९ जून रोजी छावणी बाजारात बनावट नोटा जवळ बाळगताना दोघांना गुन्हेशाखा पोलिसांनी पकडले होते, तर तिसरा आरोपी माणिक तुळशीराम आव्हाड यास वाळूज महानगर १ येथून अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. चौकशीदरम्यान यात चौथा आरोपी राजन ब्राह्मणे यास दि. २१ जून रोजी लोणी येथे पकडले. त्याच्या अटकेची माहिती त्याचा भाऊ किरण उर्फ ॲलेक्स अशोक ब्राह्मणे यांना कळविली. आज २२ जून रोजी छावणी पोलिसांनी आरोपी ब्राह्मणे यास १०वे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले.

आरोपींनी बनावट नोटा कोठून आणल्या आणि कोणाकडून घेतल्या? नोटा त्याने कोणास दिल्या? या नोटा पुरवणारा मुख्य सूत्रधार कोण; याबाबत तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली. यावेळी आरोपींचे वकील ॲड. संतोष लोखंडे आणि ॲड. सुनीता सोनवणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीच्या अटकेची माहिती त्यास आणि त्याच्या नातेवाईकाला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. असे असले तरी आरोपीला त्याच्या अटकेच्या कारणांची लेखी नोटीस मिळणे हा त्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत. यावेळी आरोपीला दिलेल्या नोटीसवर, त्याची स्वाक्षरी घेतल्याचे सादर करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिस आरोपीच्या स्वाक्षरीचे पत्र न्यायालयात सादर करू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने त्यास जामीन देण्याची विनंती ॲड. लोखंडे यांनी केली. आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्यास तत्काळ जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणातील अन्य आरोपींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन पोलिसांनी न केल्याने जामीन मंजूर केला होता.

बनावट नोटा प्रकरणातील आरोपी राजन ब्राह्मणे यास आज न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याच्या अटकेच्या नोटीसवर त्याची स्वाक्षरी घेतली नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या बाबींवरच न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.- संजय रोकडे, पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी, छावणी पोलिस ठाणे

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय