‘त्या’ आरोपीना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: March 26, 2017 23:06 IST2017-03-26T23:02:10+5:302017-03-26T23:06:30+5:30
पारध : धोंडखेडा येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना २९ मार्च पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी भोकरदन न्यायालयाने सुनावली.

‘त्या’ आरोपीना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पारध : धोंडखेडा येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना २९ मार्च पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी भोकरदन न्यायालयाने सुनावली.
९ मार्च रोजी कोदा येथील रहिवासी व सासरवाडीत वास्तव्यास असलेला संतोष घनघाव याचा शेती पत्नीच्या नावावर करण्याच्या कारणावरून पत्नी अरूणा, सासरा शेषराव कोल्हे आणि सासू कांताबाई कोल्हे यांनी संगनमत करून गळफास देऊन खून केला होता. मृताचा भाऊ समाधान घनघाव यांच्या फिर्यादी वरून पारध पोलिसांनी शुक्रवारी आरोपितांवर गुन्हे दाखल करून अटक केली. भोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तीनही आरोपींना २९ मार्चपर्यंत म्हणजे पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)