रिझवानखानच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 20:55 IST2019-05-02T20:54:37+5:302019-05-02T20:55:11+5:30

सुरक्षा रक्षक रिझवान खान रशीद खान यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले खालेद अबू व शेख अब्दुल माजिद या दोघांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 Police custody of both of Rizwan Khan murder killings | रिझवानखानच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी

रिझवानखानच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : चिकलठाणा येथील सुरक्षा रक्षक रिझवान खान रशीद खान यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले खालेद अबू व शेख अब्दुल माजिद या दोघांना गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांनी ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


वरील दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील जरीना दुर्रानी यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करावयाचा आहे.

आरोपींच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करावयाची आहे. गुन्ह्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title:  Police custody of both of Rizwan Khan murder killings