शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

औरंगाबादमध्ये स्वच्छतागृहातील अधिकच्या वसुलीची चक्क पोलिसांत तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:01 PM

मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या आहेत; परंतु या तक्रारी केवळ बसस्थानकापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे उकाळण्याचा प्रकार सुरूच राहिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांत प्रथमच एका प्रवाशाने थेट पोलिसांत तक्रार देऊन या प्रकाराला वाचा फोडल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या आहेतबानेवाडी (ता. बार्शी) येथील रहिवासी विठ्ठल लोखंडे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात अधिक पैसे मागितल्याची तक्रार एका अर्जाद्वारे केली आहे.

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या आहेत; परंतु या तक्रारी केवळ बसस्थानकापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे उकाळण्याचा प्रकार सुरूच राहिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांत प्रथमच एका प्रवाशाने थेट पोलिसांत तक्रार देऊन या प्रकाराला वाचा फोडल्याचे समोर आले आहे.

बानेवाडी (ता. बार्शी) येथील रहिवासी विठ्ठल लोखंडे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात अधिक पैसे मागितल्याची तक्रार एका अर्जाद्वारे केली आहे. ते ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात आंघोळीसाठी गेले. स्वच्छतागृहातील फलकावर आंघोळीसाठी ३, तर स्वच्छतागृहासाठी २ रुपये शुल्क लिहिलेले आहे; परंतु या ठिकाणी त्यांना २० रुपये मागण्यात आले. त्यामुळे जास्तीचे पैसे का मागता, अशी विचारणा त्यांनी स्वच्छतागृहातील कर्मचार्‍यास केली; परंतु त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा आल्यास मारहाण केली जाईल, अशी धमकीही दिली.

या प्रकारानंतर विठ्ठल लोखंडे यांनी सरळ क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून अर्जाद्वारे स्वच्छतागृहात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांंनी केली आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहात महिलांसाठी पैसे आकारण्यात येऊ नये, असा नियम आहे; परंतु या ठिकाणी महिलांना पैसे आकारल्याच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत. या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत; पण तरीही सर्वसामान्य प्रवाशांची अडवणूक केली जाते. विशेषत: सकाळी आणि रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक होतो. अनेक प्रवासी विशेषत: ग्रामीण भागातील प्रवासी मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होतात, तर अनेक जण घाईगडबडीमुळे तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे हा प्रकार सुरूच असल्याचे दिसते; परंतु गेल्या महिन्यांत पहिल्यांदाच यासंदर्भात पोलिसांत तक्रार पोहोचली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक शिवाजी वाडेकर तपास करीत आहेत.

दर महिन्याला ४ हजारांचा दंडस्वच्छतेसह अधिक रक्कम उकाळल्यासंदर्भात प्रवाशांकडून आगार व्यवस्थापकांकडे दर महिन्याला ६ ते ८ तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीपोटी स्वच्छतागृहात ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतचा दंड लावला जातो; परंतु तरीही सुधारणा होत नसल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचे दिसते. आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड म्हणाले, अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे यासंदर्भात स्वच्छतागृहाच्या सुपरवायझरला सक्त सूचना करण्यात आली आहे.

स्टेशनवरील स्वच्छतागृहाची ट्विटरवर तक्रारऔरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी प्रवाशांकडून एक रुपया वसूल केला जात आहे. लघुशंकेसाठी पैशाची होणारी आकारणी पाहून आश्चर्यचकित होत आहे. १ जानेवारी रोजी संजीव दास यांनी टिष्ट्वटरवरून रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतागृहाची रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. स्वच्छतागृह, स्नान, लघुशंकेसाठी होणार्‍या दर आकारणीसह येथील कर्मचारी मद्यपान करून असतात. तसेच प्रवाशांबरोबर खालच्या स्तरावर बोलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद