मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:43 IST2019-01-15T18:40:57+5:302019-01-15T18:43:42+5:30
१६ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी पोलीस कोठडी सुनावली.

मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस कोठडी
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सद्दाम ऊर्फ साहील पाशूभाई शेख याला विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीला दोन वर्षांनंतर बीड जिल्ह्यात अटक करून सोमवारी (दि. १४ जानेवारी) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.