शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आडत दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST

केज : सध्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हाताला आलेले धान्य शेतकरी आडत दुकानदाराकडे विक्रीसाठी आणत आहेत.

केज : सध्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हाताला आलेले धान्य शेतकरी आडत दुकानदाराकडे विक्रीसाठी आणत आहेत. मात्र व्यापारी त्यांचा माल कमी भावात खरेदी करुन खरेदीची पक्की पावती देत नसल्याचा आरोप भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मोहन गुंड यांनी केला आहे.केज येथील मोंढा भागात विक्रीसाठी शेतकरी माल आणतात. माल मोजताना एक ते दोन किलो धान्य काढून घेण्यात येते. शेतकऱ्यांकडून आडतही घेतली जाते. हमालीही घेतली जाते. याकडे मोंढ्यातील व्यापारी कानाडोळा करतात. दुकानावर धान्य दिल्यानंतर त्याची कमी भावात खरेदी करुन माल खरेदीची पक्की पावती दिली जात नाही, असा आरोप गुंड यांनी केला आहे.हमी भावापेक्षा कमी भावाने माल खरेदी करू नये, दोन दिवसात मोंढ्यातील व्यवहारात सुधारणा झाली नाही तर बाजार समितीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असेही गुंड यांनी म्हटले आहे. केज तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांची लूट होत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकरी हवालदिल होतील. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आस्थापूर्वक पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर दरवर्षी अस्मानी संकट कोसळत आहे. पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्याला तोंड देत शेतकरी धान्य पिकवितो. मात्र ते विक्रीस आणले असता हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केला जाते. यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानांचा परवाना कायमचा रद्द करावा, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.शेकाप आंदोलनाच्या पावित्र्यातजो व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करेल, त्याचा पंचनामा करुन त्याच्यावर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांनी त्यांचा माल पक्क्या पावतीशिवाय देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी पुढाकार घेऊन दुकानदारांना सूचना द्याव्यात, अन्यथा आंदोलन करू, असे अशोक रोडे, योगेश्वर अंबाड, श्रीराम तांदळे, हनुमंत मोरे, विनोद आगलावे, गजेंद्र देशमुख यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)