शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

प्लास्टिक बंदीने औरंगाबाद जिल्ह्यातील ४० उद्योग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:47 IST

प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणारे छोटे-मोठे ४० उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी ३ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शिवाय ७० कोटींची उलाढाल थांबली आहे.

ठळक मुद्दे७० कोटींची उलाढाल थांबली : प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग उत्पादन थांबले

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणारे छोटे-मोठे ४० उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी ३ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शिवाय ७० कोटींची उलाढाल थांबली आहे.२०० मिलीपर्यंतच्या बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे २०० ऐवजी २५०, ३०० आणि ५०० मिलीपर्यंतच्या बाटल्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक कप, थर्माकोल व प्लास्टिकचे ताट, ग्लास, कप, प्लेट, ग्लास, वाटी, चमचा, स्ट्रॉ, कॅरिबॅगवर बंदी लावण्यात आली. यामुळे या साहित्याची उत्पादने घेणाऱ्या जिल्ह्यातील उद्योगांवर संकट कोसळले.जिल्ह्यातील ४० उद्योगांतील उत्पादन सध्या बंद आहे. प्लास्टिक कप, ग्लास यासह शॉपिंग बॅगची जाडी वाढवून उत्पादनास परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. आज ना उद्या ही परवानगी मिळेल, या अपेक्षेने प्रत्येक जण वाट पाहत आहे. त्यामुळे अजूनही कामगार पूर्ण काढण्यात आलेले नाहीत. आगामी काही दिवसांत अनुकूल निर्णय झाला नाही तर हे उद्योग कायमस्वरुपीबंद होतील. परिणामी ३ हजार कामगार उघड्यावर येण्याची भीती आहे.जिल्ह्यात १० ते १२ उद्योग बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात आहेत. त्यातून सुमारे वार्षिक १० क ोटींच्या आसपास उलाढाल होते. २०० मिलीच्या बाटलीबंद पाणी विक्र ीवर बंधने आली. यामुळे झाक ण, स्लीव्हस्,पॅके जिंग, लेबल्स प्रिंटिंग या उद्योगांवर परिणाम झाला. परंतु यासंदर्भातील उद्योगांनी आता मोठ्या आकाराच्या बाटल्यांच्या उत्पादनांवर भर दिला आहे. त्यामुळे बाटली उद्योगावर फार परिणाम झाला नाही. कायमस्वरुपी बंद होण्याची वेळ आलेल्या प्लास्टिक उद्योगांच्या मालकांसह कामगार अडचणीत सापडल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. २०० मिलीच्या पाणी बाटलीसह पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅगचा साठा उत्पादक-विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांकडेही पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणी पाऊचवरदेखील बंदी आली आहे. यासंदर्भात काहींनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे, अशी माहितीही उद्योजकांनी दिली. आजघडीला कारवाईच्या भीतीपोटी रेल्वेस्टेशन, बसस्थानक, हॉटेल याठिकाणी पाणी पाऊच दिसत नाहीत.मुख्यमंत्र्यांकडे मागणीकॅरिबॅग बंदीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु मराठवाड्यातील उद्योग बंद होऊ नये,यासाठी पर्यावरणपूरक अशा पद्धतीने पाणी ग्लास, ६० जीएसएम बॅग यांसह अन्य साहित्यांची जाडी वाढवून उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांकडे केली आहे. आजघडीला जिल्ह्यातील ४० उद्योगांचे उत्पादन बंद पडले आहे. त्यामुळे महिन्याकाठी ७० कोटींची उलाढालही थांबली आहे. आज ना उद्या काही निर्णय होईल,याकडे उद्योग मालक आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.-प्रवीण काला, सचिव, मराठवाडा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनउत्पादन घेणाºयांवर कारवाई२०० मिलीपर्यंतच्या पाणी बाटलीवर बंदी आहे. शिवाय २०० मिलीपर्यंतच्या द्रवपदार्थाच्या पाऊचवरही बंदी आहे. जिल्ह्यात उद्योगांचे मंडळाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. बंदी असलेल्या उत्पादनाच्या वापरासंदर्भात महापालिकेने कारवाई केली पाहिजे, तर त्यांचे उत्पादन सुरूअसेल तर त्यावर आमच्याकडून कारवाई केली जाईल. आतापर्यंत एका कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.- ज. अ. कदम, उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय