शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करमाडच्या ‘मेडिकल हब’ मधून राज्यभर औषधी पाठविण्याचे नियोजन कागदावरच

By संतोष हिरेमठ | Updated: May 24, 2025 13:35 IST

राज्यस्तरीय औषधी भांडार : ३० कोटींच्या निधीतून उभारणी; चार वर्षांनंतर बांधकाम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : करमाड (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ‘मेडिकल हब’ म्हणजे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. कारण, हे ठिकाण राज्याचे मध्यवर्ती असून, येथून राज्यभरात सरकारी रुग्णालयास औषधी पाठविणे सोपे होईल, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले. इमारत बांधून तयार आहे; पण येथून अद्याप औषध भांडार कार्यान्वित झालेले नाही. सद्या खरेदीप्रक्रियेनंतर पुरवठादारांकडून थेट सरकारी रुग्णालयांपर्यंत औषधी, वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या मेडिकल हबचा वापर कसा करायचा? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करमाड येथे औषधी भांडारसह प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-१ डॉ. निपुण विनायक आणि सचिव-२ वीरेंद्र सिंह यांनी औषधी भांडारला भेट दिली. त्यामुळे गेले काही दिवस युद्धपातळीवर विद्युतीकरणासह रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने चांगलाच जोर लावला.

पूर्वी ई-निविदा, मग ‘हाफकिन’, आता प्राधिकरणआरोग्य विभागाने २०११ पासून ई-निविदा पद्धतीने औषधी साहित्य, सामग्रीच्या मध्यवर्ती खरेदी प्रणालीचा अवलंब सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ‘हाफकिन’कडून औषधी खरेदी सुरू करण्यात आल्यानंतर हे राज्यस्तरीय औषध भांडार गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, या औषधी भांडारची नियोजनाप्रमाणे उभारणी करण्यात आली. ‘हाफकिन’ऐवजी आता स्वतंत्र ‘महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण’च्या माध्यमातून औषधी खरेदी होत आहे. खरेदी प्रक्रियेनंतर थेट रुग्णालयांना औषधी पाठविली जातात. त्यामुळे या मेडिकल हबचा वापर कसा होईल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

३० कोटींच्या निधीतून उभारणीराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औषधी भांडार आणि प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी २०१९ मध्ये ३० कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर दोन वर्षांनी छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यास सुरुवात झाली. या औषधी भांडारच्या बांधकामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली. तब्बल चार वर्षांनंतर आता कुठे काम पूर्ण झाले.

वरिष्ठ पातळीवरून नियोजन, निर्णयकरमाड येथील औषधी भांडारचे काम पूर्ण झालेले आहे. औषधी भांडारच्या वापरासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून नियोजन आणि निर्णय होईल.-डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmedicineऔषधं