त्आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणाु
By Admin | Updated: December 20, 2015 23:48 IST2015-12-20T23:43:13+5:302015-12-20T23:48:48+5:30
ळजापूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवकांची देखील अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य

त्आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणाु
ळजापूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवकांची देखील अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे. अनेक आरोग्य केंद्रातील सेवा ही प्रभारींवर चालत असून, रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यात मंगरूळ, सावरगाव, अणदूर, नळदुर्ग, जळकोट, काटगाव आणि सलगरा ही सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरळी येथे नागरी दवाखान्यामार्फत ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविली जाते. या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्येकी दोन जागा मंजूर आहेत. मात्र, सद्यस्थितीत काटगाव आणि सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी एकेक वैद्यकीय अधिकारी हे शिक्षणासाठी बाहेरगावी गेले असल्याने येथील भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहेत. आररी नागरी दवाखान्यातही अशीच परिस्थिती आहे. याशिवाय इतर पाच ठिकाणी तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेच रिक्त असल्यामुळे तेथील कारभार प्रभारींवर सुरू आहे. अशा स्थितीत आरोग्य सेवा पुरविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक रुग्णांना नाविलाजास्तव खाजगी रुग्णालयात जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासोबतच तालुक्यात ३२ उपकेंद्रे असून, यापैकी केशेगाव, उमरगा (चि), खुदावाडी, हंगरगा (नळ), सलगरा (म), खडकी, पिंपळा (खु), कुंभारी, होर्टी, शहापूर, काक्रंबा, जळकोटवाडी आणि आरळी अशा तेरा ठिकाणची आरोग्य सेवकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे येथील कामही अतिरिक्त आरोग्य सेवकांमार्फतच चालू असल्याचे दिसते.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बिलापट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंगरूळ येथील आ२ोग्य सेवकाकडे सध्या कुंभारी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आरोग्य सेवकांची पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्रांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी देखील टेंडर मागविण्यात आले असून, काही ठिकाणी कामे सुरूही झाली असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
तालुक्यातील सात आरोग्य केंद्रांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या आठ महिन्याच्या कालावधीत ९७२ महिलांची प्रसुती करण्यात आली. तर उपकेंद्रातील हा आकडा २९४ इतका आहे. तसेच याच कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीही ९२ हजारावर तर उपकेंद्राची ओबीडी २ हजार ७९५ एवढी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठ महिन्यात ५९९ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. असे असताना येथील रिक्त पदे भरण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
शौचालयाची वानवा
४तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शौचालयाची सोय नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्ण व नातेवाईकांची देखील हेळसांड होत आहे. शिवाय काही ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा वावरही वाढल्याचे दिसते.