पिंपळगाव सैलानी येथे महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 02:23 AM2017-01-24T02:23:15+5:302017-01-24T02:23:15+5:30

मृतक औरंगाबाद येथील; २१ जानेवारी रोजी दर्गा परिसरात आढळला होता मृतदेह.

Pimpalegaon Selani murder case | पिंपळगाव सैलानी येथे महिलेची हत्या

पिंपळगाव सैलानी येथे महिलेची हत्या

googlenewsNext

पिंपळगाव सैलानी, दि. २३- सैलानी येथे २१ जानेवारी रोजी दर्गा परिसरात मोकळ्या टिनशेडमध्ये महिलेचे प्रेत आढळले होते. या महिलेच्या नातेवाइकांचा शोध पोलिसांनी घेतला असता, या अनोळखी महिलेची ओळख पटली आहे. या मृत महिलेचे नाव अमिना सय्यद लुकमान वय ४0 वर्षे रा.भईवाळा औरंगाबाद असे नाव असून, या मृत महिलेची बहीण शमीना शेरुखान वय ४५ वर्षे, राहणार नवपाल बांद्रा मुंबई हिने मृत माझी लहान बहीण असून, हिचा खून केल्याची तक्रार रायपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरून बुलडाणा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावस्कर, बुलडाणा पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर ठाणेदार जे.एन.सय्यद यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अप.क्र.३१/0१७ कलम ३0२ खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सय्यद, एएसआय यशवंत तायडे, शेख कय्युम मुसा आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: Pimpalegaon Selani murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.