फुलंब्री शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; गृहमंत्री फडणवीस यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:38 IST2023-09-04T18:38:42+5:302023-09-04T18:38:55+5:30
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

फुलंब्री शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; गृहमंत्री फडणवीस यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
फुलंब्री : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध म्हणून शहरात सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चेच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
आज सकाळी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देवगिरी कारखानापासून बसस्थानकपर्यंत पर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.