शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:41 IST

महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र-राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पहिल्यांदाच परफॉर्मन्स ऑडिट करण्यात आले. मुंबई येथील महालेखाकार कार्यालयातील एका पथकाने मागील आठ दिवसांत स्मार्ट सिटीत ऑडिट केले. या ऑडिटचा अहवाल थेट केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. देशभरातील शंभर स्मार्ट सिटीचे ऑडिट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालावरून स्मार्ट सिटीचे पुढील भविष्य ठरणार आहे.

केंद्र शासनाने देशभरातील शंभर शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश केला. त्यात राज्यातील आठ शहरांचा समावेश आहे. आठमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले. हा अहवाल लवकरच केंद्र शासनाला सादर होईल. यापूर्वी डिसेंबर २०२३ पर्यंत परफॉरमन्स ऑडिट करण्यात आले होते. ‘स्मार्ट सिटी’ची मुदत दि. ३० जून २०२४ पर्यंत होती. त्यानंतर दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी २.० संदर्भात आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्राने स्मार्ट सिटीचा उल्लेख केला नाही. भविष्यात केंद्राकडून स्मार्ट सिटी २.० प्रकल्प राबविला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

फायलींची बारकाईने तपासणीऑडिटसाठी आलेल्या पथकाने डिसेंबर ते जून या सहा महिन्यांचे ऑडिट केले. ऑडिटसाठी वेगवेगळ्या फायली अत्यंत बारकाईने तपासण्यात आल्या. फायलींच्या झेरॉक्स प्रती त्यांनी सोबत नेल्या. ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून करण्यात आलेली कामे, कामे करताना नियम, निकष पाळण्यात आले का? निर्धारित वेळेत कामे झाली का? कामे करण्याची गती कशी होती, त्याची गुणवत्ता, आदींबाबत ऑडिट करताना नोंद घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी