शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पादचार्‍यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : रोशनगेट ते चंपाचौक हा रस्ता खूप अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नागरिक वाहने उभी करतात.

औरंगाबाद : रोशनगेट ते चंपाचौक हा रस्ता खूप अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नागरिक वाहने उभी करतात. एक दुचाकी वाहन दोन्ही बाजूने ये-जा करू शकते एवढीच जागा रस्त्यावर उरते. त्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारक तुटलेल्या दुभाजकाचा फायदा घेऊन वाहने चालवत असल्याने पादचार्‍यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यंत दाट आणि २४ तास गजबजलेल्या वसाहती आहेत. रोशनगेट ते चंपाचौक या मुख्य रस्त्यावर सकाळ-सायंकाळ रस्ता ओलांडणे खूपच अवघड होते. ८० फूट रूंद रस्ता प्रत्यक्षात वापर करताना २० ते ३० फूटच मिळतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि दुकानांसमोर उभी असणारी वाहने अलीकडच्या काळात डोकेदुखी ठरत आहेत. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत, तर या भागात सतत ट्रॅफिक जाम होत असते. दुपारी साडेबारा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर सीमा दूध डेअरीजवळ विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. १५ वर्षांपूर्वी चंपाचौक ते रोशनगेट रस्त्यावर मनपाने दुभाजक उभारून लोखंडी ग्रिल उभारले होते. काळानुसार हे ग्रिल आज गायब झाले आहेत. दुचाकी वाहनधारक याचा फायदा उचलत या रस्त्यावरून त्या रस्त्यावर सहजपणे ये-जा करतात. अनेक वाहनधारक नको त्या ठिकाणी वळसा घेत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे मनपा कधीच लक्ष देत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने पादचार्‍यांना ये-जा करण्यासाठी अजिबात जागा नसते. रस्त्याच्या कडेने लहान मुले, महिला ये-जा करीत असतात. त्यातही भरधाव वेगाने दुचाकी वाहनधारक पादचार्‍यांच्या अंगावरच वाहने घालतात. या रस्त्यावर एक शाळाही आहे. शाळा सुटल्यानंतर तर बर्‍याचवेळा ट्राफिक जाम होते.ऐतिहासिक रोशनगेटच्या उजव्या बाजूला खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्याची डागडुजी तरी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी केली आहे.