वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:08 IST2019-01-11T17:08:26+5:302019-01-11T17:08:35+5:30
रस्ता ओलांडणाऱ्या पादचाºयाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पंढरपूरातील तिरंगा चौकात घडली.

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
वाळूज महानगर : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाºयाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पंढरपूरातील तिरंगा चौकात घडली.
पंढरपूर तिरंगा चौकातील पोलीस चौकीकडून गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अनोळखी पादचारी तरुण रस्ता ओलांडून पलीकडे जात होता. यावेळी वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वाहनाने पादचाºयास जोराची धडक दिली. या त गंभीर जखमी झालेल्या पादचाºयाला वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयत पादचाºयाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही.