पराभवाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, म्हणून पवार, ठाकरे प्रचारापासून दूर: देवेंद्र फडणवीस
By बापू सोळुंके | Updated: December 1, 2025 19:00 IST2025-12-01T18:58:49+5:302025-12-01T19:00:02+5:30
आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे नसते.

पराभवाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, म्हणून पवार, ठाकरे प्रचारापासून दूर: देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर: या निवडणुकीत विरोधकांचा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाचा शिक्का माथी लागू नये, म्हणून महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उध्दव ठाकरे प्रचारात फिरत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी(दि. १) येथे लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे नसते. निवडणुकीतून माघार घ्यायची नसते. परंतु विरोधकांकडून अशा प्रकारे नगर परिषद निवडणूक प्रचाराला पाठ दाखवणे हे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते शेवटी लक्षात ठेवतात जेव्हा त्यांची वेळ होती तेव्हा नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही.
७० ते ७५ टक्के जागा जिंकू
न.प. निवडणुकीत भाजप नंबर वन राहील आमच्या पक्षाने कुठला सर्व्हे केल्याचे माहित नाही. पण नंबर या निवडणुकीत भाजप एक नंबर चा पक्ष राहील आणि दोन्ही मित्र पक्ष त्याच्या खालोखाल राहील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष मिळून ७० ते ७५ टक्के जागा जिंकतील असा दावाही त्यांनी केला.
राऊत आमचे राजकीय विरोधक
खासदार संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे . त्यांचे काम करतात आम्ही आमचे काम करतो, पण कुणीही आमचा शत्रू नाही ते राजकीय विरोधक आहे. कुठलाही राजकीय विरोधक आजारी पडला तर तो लवकर बरा झाला पाहिजे ही आमची कामना असते.