क्षीरसागरांच्या मागणीची पवारांनी घेतली दखल
By Admin | Updated: June 22, 2014 00:05 IST2014-06-21T23:24:23+5:302014-06-22T00:05:39+5:30
बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़

क्षीरसागरांच्या मागणीची पवारांनी घेतली दखल
बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़ दरम्यान, राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये अशी भूमिका सर्वात आधी गटनेते डॉ़ भारतभूषण क्षीरसागर यांनी पवारांकडे मांडली होती़
३ जून रोजी गोपीनाथराव मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़ मुंडे यांची राजकीय झेप अतिशय संघर्षमय राहिलेली आहे़ त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातील कोणालाही उभे केले तर राष्ट्रवादीने उमेदवार देऊ, नये अशी विनंती बीडचे माजी नगराध्यक्ष तथा गटेनेते डॉ़ भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती़ त्यानुसार शनिवारी मुंबईतील सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शरद पवार यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही़ मुंडे यांना राष्ट्रवादीकडून हिच श्रद्धांजली असणार आहे, अशी घोषणा केली आहे़ त्यामुळे क्षीरसागर यांनी केलेली मागणी शरद पवार यांनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय कर्तृत्व उत्तुंग आहे. त्यांच्यासारखा नेता होणे नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्याच विचाराचा वारसदार लोकसभेत गेला पाहिजे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.(प्रतिनिधी)