शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पासचा अपहार ; वाहतूक नियंत्रक निलंबित

By admin | Updated: May 31, 2016 23:20 IST

लातूर : परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराअंतर्गत त्रैमासिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ प्रथम चौकशीत २५ पासमधील रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे़

लातूर : परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराअंतर्गत त्रैमासिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ प्रथम चौकशीत २५ पासमधील रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे वाहतूक नियंत्रक अजित बोयणे यांना आगार प्रमुखांनी निलंबीत केले आहे़ या वाहतूक नियंत्रकाने आत्तापर्यंत दिलेल्या सर्व पासेसची तपासणी केली जात असून, त्यात असाच दोष आढळल्यानंतर पोलिस कारवाई केली जाणार आहे़महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाअंतर्गत निलंगा व उदगीर या ठिकाणीही वर्षभरापुर्वी त्रैमासिक पासमध्ये अपहार झाला होता़ या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ही करण्यात आली होती़ या घटनेला वर्ष उलटले नाही़ तोपर्यतच लातूर आगारातही त्रैमासिक पासमध्ये अपहार झाल्याचे समोर आले आहे़ सोमवारी केलेल्या तपासणीमध्ये २५ पासमध्ये अपहार केल्याचे उघड झाले आहे़ उर्वरीत पासचीही तपासणी सुरुच आहे़ या बरोबरच इतर विभाग नियंत्रकांनीही दिलेल्या पासची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे़ या चौकशीनंतरच अपहारातील लाखोंचा आकडा समोर येणार आहे़ शासन परिपत्रकानुसार मासिक, वार्षिक, त्रैमासिक पाससाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचे आदेश दिले असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून २०११ पासून हस्तलिखीतच पास देण्याचा पायंडा लातूर आगाराने कायम ठेवला आहे़ हा पायंडा तत्कालिन आगारप्रमुख व स्थानकप्रमुख यांच्या आदेशाने सुरु ठेवला असल्याने या अपहारामुळे त्यांचाही हात आहे की काय अशी शंका एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांतून उपस्थित केली जात आहे़ या झालेल्या अपहाराबद्दल लेखाधिकाऱ्यांनाही माहिती झाली होती़ तरीही या बाबत वरीष्ठांकडे तक्रार न करता तेही चीडीचुप बसले असल्याचे दिसून येत आहे़ प्रथम दर्शनी या अपहारामध्ये वाहतूक नियंत्रक अजित बोयणे याच्यावर निलंबणाची कारवाई झाली असली तरी या अपहारामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे़ परंतू या प्रकरणाकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून डोळे झाक केली जात आहे़ वाहतूक नियंत्रकाकडून झालेल्या अपहार प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करणार असल्याचे आगार प्रमुखांकडून सांगितले जात असले तरी या प्रकरणात गुंतलेल्या इतर अधिकाऱ्यांकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येत आहे़