स्टेशनवर प्रवाशांनी पकडले चोरट्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:48 IST2019-01-15T18:48:43+5:302019-01-15T18:48:56+5:30
नागपूर-नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये चढताना पैसे चोरणाऱ्यास प्रवाशांनी पकडल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजता रेल्वेस्टेशनवर घडली.

स्टेशनवर प्रवाशांनी पकडले चोरट्याला
औरंगाबाद : नागपूर-नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये चढताना पैसे चोरणाऱ्यास प्रवाशांनी पकडल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजता रेल्वेस्टेशनवर घडली.
सय्यद सरताज सय्यद सिकंदर (२७, रा. मिसारवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सारंग जैस्वाल (रा. भडगाव, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला जामीन मंजूर झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.