शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:30 AM

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने लाईफलाईन असलेल्या एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने लाईफलाईन असलेल्या एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर बीड विभागातील आठ आगारातून पुरेसे नियोजन केले असून, संपात सहभागी नसलेल्या कर्मचा-यांची मदत घेतली जाणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. हा बेमुदत संप प्रशासनाने कितीही हाणून पाडला तरीही १०० टक्के यशस्वी होणार असल्याचा दावा एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव अशोक गावडे यांनी केला आहे.दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी बाहेरगावच्या नागरिकांना एस. टी. बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सण सुरु होताच एस. टी. कर्मचा-यांनी संप पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची कोंडी होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुरेसे नियोजन केले असून, संपात सहभागी नसलेल्या संघटनेच्या कर्मचा-यांच्या मदतीने बसेस सोडण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ७० टक्के कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे एस. टी.चे नियोजन कोलमडणार असून, प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे.दरम्यान, प्रवाशांची अडचण होणार नाही यासाठी विभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक आगारासाठी एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. आगार प्रमुख आणि पालक अधिकारी यांच्या समन्वयाने व्यवस्थापन सुरळीत करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक असेल तेथील बस फेºयांमध्ये वाढ केली जाणार असून, उपलब्ध कर्मचारी संख्येनुसार बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.सोमवारी दिवसभर संपाबाबत काय निर्णय होतो याकडे एसटी कर्मचा-यांचे लक्ष लागले होते. या संपाला ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला असून, यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सय्यद हमीद, सूर्यभान नवले, महारुद्र मोराळे, डॉ. संजय तांदळे, अरुण खोडसकर उपस्थित होते.दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणा-यांकडून अवाजवी भाडे आकारुन लूट सुरु केली आहे. पुण्यासाठी हजार, तर मुंबईसाठी दीड हजार रुपये भाडे आकारले जात आहे. संप सुरु राहिल्यास त्याचा फटका मात्र प्रवासी जनतेला बसणार आहे.